मराठी बातम्या /बातम्या /देश /

महापूरात फक्त माणसांनीच नाही प्राण्यांनीही वाचवला आपल्या पिलांचा जीव, VIDEO पाहून डोळ्यात येईल पाणी

महापूरात फक्त माणसांनीच नाही प्राण्यांनीही वाचवला आपल्या पिलांचा जीव, VIDEO पाहून डोळ्यात येईल पाणी

संकट काळात माणसे आपल्याच जवळच्या माणसांना साथ देत नाही. मात्र प्राणी आपल्या माणसांना संकटात सोडून कधीत जात नाहीत अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली आहे.

  विजापूर 18 ऑक्टोबर: मुसळधार पावसाने देशातल्या अनेक राज्यांना झोडपून काढलं आहे. अनेकांचा बळी गेला आणि कोट्यवधी रुपयांची हानी झाली. शेतकऱ्यांचं तर कंबरडच मोडून गेलं. अनेक संसार उघड्यावर पडले अनेकांना आपल्या जीवलगांना गमवावं लागलं. तर अनेकांनी आपला जीव धोक्यात घालून आपल्या मुलांना सुरक्षीत स्थळी हलवलं होतं. या आस्मानी संकटाचा धक्का हा काही फक्त माणसांनाच बसला नाही तर प्राण्यांनाही बसला आहे. सध्या सोशल मीडियावर असाच एक VIDEO व्हायरल झाला असून कुत्रा आपल्या पिलाला पाण्यातून सुरक्षीत स्थळी हलविताना त्यात दिसत आहे.

  कर्नाटकातल्या विजापूर जिल्हाला सुद्धा पावसाचा मोठ फटका बसला. विजापूर जवळचं तारापूर हे गावही जलमय झालं आहे. लोकांनी सुरक्षीत स्थळी आश्रय घेतला. याच गावात एक कुत्र्याला पिल्लं झाली होती आणि ती पाण्यात अडकून पडली होती. पाणी वाढत होतं त्यामुळे तिला बाहेर पडता येत नव्हतं.  आपल्या पिलांचं काय होणार या चिंतेने तिची घालमेल सुरू होती. #WATCH Karnataka: A female dog rescues her puppy and shifts it to a safer location in flood-affected Tarapur village of Vijayapura district. Several parts of the state are reeling under flood, triggered due to rainfall. (17.10.2020) pic.twitter.com/0BgWCl4kDq — ANI (@ANI) October 18, 2020 त्यानंतर तिने पाण्याचा अंदाज घेऊन आपल्या पिलांना सुरक्षित स्थळी हलविण्याचा निर्णय घेतला आणि एक एक करत सर्व चारही पिलांना जवळच्याच एका खोलीत हलवलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्राणी मित्रांनी त्यावर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. संकट काळात माणसे आपल्याच जवळच्या माणसांना साथ देत नाही. मात्र प्राणी आपल्या माणसांना संकटात सोडून कधीत जात नाहीत अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली आहे.
  Published by:Ajay Kautikwar
  First published:

  Tags: Rain

  पुढील बातम्या