डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत दौरा.. एक वर्षाच्या तान्हुल्याला घेऊन महिला पोलीस कर्तव्यावर

डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत दौरा.. एक वर्षाच्या तान्हुल्याला घेऊन महिला पोलीस कर्तव्यावर

एक वर्षाच्या बाळाला घेऊन महिला पोलीस कर्तव्य बजावत आहे. मातृत्व आणि कर्तव्याची जबाबदारी पार पाडत आहे.

  • Share this:

अहमदाबाद,23 फेब्रुवारी-अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) 24 फेब्रुवारीला भारत दोऱ्यावर येत आहेत. त्यांच्या भारत दौऱ्याची जोरदार तयारी सुरू आहे. त्यांच्या सोबत त्यांची पत्नी, त्यांची मुलगी आणि जावई सुद्धा भारतात येणार आहेत. तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे सल्लागार सुद्धा येणार आहे. 24 तारखेला ट्रम्प थेट गुजरामध्ये उतरणार आहे. अहमदाबादमध्ये ट्रम्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत रोडशो करणार आहेत. आणि तिथं असलेल्या मोटेरा क्रिकेट स्टेडियमचं उद्घाटन ट्रम्प यांच्या हस्ते होणार आहे. ट्रम्प यांच्या या दौऱ्यामुळे अहमदाबादमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. हजारो सुरक्षा कर्मचारी दिवस रात्र पहारा देत आहेत. अहमदाबादच्या विसातमध्ये एक महिला पोलीस कर्मचारी आपलं कर्तव्य आणि मातृत्व अशा दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडताना दिसत आहे. त्या आपल्या एका वर्षाच्या मुलाला घेऊन आपली ड्युटी करत आहेत.

संगीता परमार असं या महिला पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. संगीता यांनी याबाबत सांगितलं की, हे थोडसं अवघड आहे पण ही माझी जबाबदारी आहे की मी एक आई म्हणून आणि दुसरं एक पोलीस कर्मचारी म्हणून जबाबदारी पार पाडायला हवी. माझ्या मुलाची तब्येत बरी नाही. त्यामुळी मी त्याला सोबत आणलं आहे आणि त्याला दूध पाजत आहे.

<blockquote class="twitter-tweet"><p lang="en" dir="ltr">Sangita Parmer, a police constable is performing her duties at Visat, Ahmadabad, with her 1 year old son. She says, &quot;It is difficult but it is my responsibility to fulfill both duties of a mother &amp; a constable. He is not well therefore I have to bring and breastfeed him&quot;.<a href="https://twitter.com/hashtag/Gujarat?src=hash&amp;ref_src=twsrc%5Etfw">#Gujarat</a> <a href="https://t.co/ccOAeLZfY3">pic.twitter.com/ccOAeLZfY3</a></p>&mdash; ANI (@ANI) <a href="https://twitter.com/ANI/status/1231503801489612800?ref_src=twsrc%5Etfw">February 23, 2020</a></blockquote> <script async src="https://platform.twitter.com/widgets.js" charset="utf-8"></script>

अहमदाबादमध्ये असलेल्या मोटेरा स्टेडियममध्ये 25 बेडचं एक तात्पुरतं रुग्मालय तयार करण्यात आलं आहे. तर सोमवारी 'नमस्ते ट्रम्प' हा कार्यक्रम होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अहमदाबादमध्ये पोहोचले आहेत. रविवारी त्यांनी मोटेरा स्टेडियममध्ये जाऊन तयारीचा आढावा घेतला.

महत्वाचं म्हणजे अहमदाबादमधील कार्यक्रम आटोपून ट्रम्प यांच्या परिवार थेट आग्र्याला रवाना होणार आहेत. तिथे ते ताजमहाल पाहतील. डोनाल्ड ट्रम्प यांच्या दिल्लीतील आगमनानंतर मंगळवारी राष्ट्रपती भवनात त्यांच्या स्वागतासाठी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. ट्रम्प काही प्रमुख भारतीय उद्योगपतींशीही चर्चा करतील. तर मंगळवारी त्यांची पत्नी मेलानिया दिल्लीतील सरकारी शाळेला भेट देतील आणि 'हॅप्पीनेस क्लास'च्या संदर्भात माहिती घेतील.

हेही वाचा..

डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी माकडं तैनात

...आणि देवेंद्र फडणवीसांनी केलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं अभिनंदन

 

 

First published: February 23, 2020, 5:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading