अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या प्राध्यापकाला विद्यार्थिनींनी भररस्त्यावर चोपले

महाविद्यालयाच्या आवारात या प्राध्यापकाची विद्यार्थिनींनी मिळून धुलाई केली. याचा व्हिडिओ रेकाॅर्ड करून व्हायरल करण्यात आला.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 7, 2018 11:37 PM IST

अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या प्राध्यापकाला विद्यार्थिनींनी भररस्त्यावर चोपले

पंजाब, 07 मे : आपल्या विद्यार्थिनींना अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या प्राध्यापकाला भररस्त्यावर विद्यार्थिनींनी  चांगलीच धुलाई केली.

शासकीय महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी आरोप केलाय की, हा प्राध्यापक अश्लिल मॅसेज पाठवायचा. या प्राध्यापकाची तक्रारही केली होती पण तरीही या प्राध्यापकाकडून मॅसेज पाठवणं सुरूच होतं.

मग महाविद्यालयाच्या आवारात या प्राध्यापकाची विद्यार्थिनींनी मिळून धुलाई केली. याचा व्हिडिओ रेकाॅर्ड करून व्हायरल करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, या विद्यार्थिनींनी परिक्षेसाठी प्राध्यापकाकडे मदत मागितली होती. त्यामुळे या प्राध्यापकाने या विद्यार्थिनीचे फोन नंबर घेऊन ठेवले. पण या प्राध्यापकाने याचा गैरवापर करत अश्लिल मॅसेज पाठवणं सुरू केलं.

हे प्रकरण पोलिसात गेल्यानंतर स्टेशनमध्ये या प्राध्यापकाने माफी मागली. महाविद्यालयाच्या प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहे.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 7, 2018 09:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...