कुटुंबाकडून दुर्लक्षित होत असल्याची भावना; डॉक्टरनं विष देऊन भाव, भाचीचा घेतला जीव

कुटुंबाकडून दुर्लक्षित होत असल्याची भावना; डॉक्टरनं विष देऊन भाव, भाचीचा घेतला जीव

Murder : 28 वर्षाच्या डॉक्टरनं विष देऊन भाऊ आणि 14 महिन्यांचा भाचीचा घेतला जीव.

  • Share this:

अहमदाबाद, 08 जून : कुटुंबाकडून दुर्लक्षित होत असल्याच्या भावनेनं अहमदाबादमधील 28 वर्षीय महिला डॉक्टरनं भाऊ आणि भाचीची विष देऊन हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सदर महिला ही दातांची डॉक्टर आहे. डॉक्टरच्याच वडिलांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी किन्नारी पटेल या डॉक्टरला अहमदाबदमधून अटक केली आहे. किन्नारीचा भाऊ जिगर पटेल ( 32 वर्षे ) याचा 5 मे रोजी मृत्यू झाला. त्यानंतर जिगरच्या 14 महिन्याच्या मुलीचा 30 मे रोजी मृत्यू झाला. माही असं जिगरच्या 14 महिन्याच्या मुलीचं नाव आहे. सहा महिन्यांपासून जिगर अशक्तपणा आल्याची तक्रार सातत्यानं करत असल्याची माहिती खूनी महिला डॉक्टरच्या वडिलांनी दिली.

काय आहे घटना

पटेल कुटुंब हे अहमदाबादमध्ये वास्तव्याला आहे. पाटण येथे गेल्यानंतर जिगर पटेल हा अचानक कोसळला. त्यानंतर त्याला रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. पण, त्याचा मृत्यू झाला होता. 5 मे रोजी घडलेल्या घटनेनं कुटुंबाला धक्का बसला.

त्यानंतर 30 मे रोजी नरेंद्र पटेल यांच्या भावाच्या घरी पटेल कुटुंबिय गेलं होतं. त्यावेळी जिगरच्या 14 महिन्यांच्या मुलीची प्रकृती खालावली. त्यावेळी किन्नारी देखील त्याठिकाणी हजर होती. त्यानंतर लगेचच 14 महिन्यांच्या माहीला रूग्णालयात हलवण्यात आलं. पण, डॉक्टरांनी माहीला मृत घोषित केलं. या साऱ्या घडामोडीमध्ये माहीचं वागणं हे संशयास्पद होतं.

मंत्रालयात 'टाईमपास' बंद करा, सरकारची कर्मचाऱ्यांना ताकीद

किन्नारीनं दिली गुन्ह्याची कबुली

यावेळी कुटुंबानं केलेल्या चौकशीअंती किन्नारीनं आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर वडिलांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी किन्नारीला अटक केली. कुटुंबाकडून दुर्लक्षित होत असल्याची भावना किन्नारीला होती. त्यामुळे तिच्या मनात न्यूनगंड तयार झाला. त्यानंतर तिनं भाऊ जिगर आणि भाची माहीला विष देऊन त्यांची हत्या केली. ठरल्यानुसार किन्नारीनं भावाच्या पेयामध्ये विष मिसळलं. किन्नारीनं आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.

SPECIAL REPORT: ठाण्यात मराठी तरुणांना नोकरी नाही? काय आहे सत्य

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 8, 2019 09:43 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading