आता काय प्रियांका गांधीही काँग्रेसच्या 'बिग बॉस'?

प्रियांका या काँग्रेसमध्ये फारशा सक्रिय नसल्यातरी त्यांचं पक्षातल्या घडामोडींवर कायम लक्ष असतं.

News18 Lokmat | Updated On: Jan 23, 2019 06:00 PM IST

आता काय प्रियांका गांधीही काँग्रेसच्या 'बिग बॉस'?

नवी दिल्ली 3 जानेवारी : काँग्रेसचे पंजाबमधले मंत्री नवज्योतसिंग सिद्धू आपल्या बोलण्याच्या खास स्टाईलसाठी प्रसिद्ध आहे. शेरोशायरी चा वापर करून बोलण्याचा त्यांचा खास असा अंदाज आहे. आपल्या ट्विटमधूनही ते अनेकदा त्याच ढंगात व्यक्त होतात. गुरुवारी त्यांनी केलेल्या एका ट्विटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासोबतचा त्यांनी एक फोटो ट्विट केला आणि या चर्चेला सुरुवात झाली.


सिद्धू यांनी गुरुवारी राहुल गांधी आणि प्रियांका गांधींची भेट घेतली आणि भेटीचं छायाचित्र ट्विट केलं, त्यावर लिहिलं होतं की, " तुम्हाला कुणी प्रोत्साहन दिलं तर ते उर्जेचं काम करतं. आयुष्यात पुढं जायला मदत करतं. आज मी आनंदाच्या सर्वोच्च शिखरावर आहे आणि माझ्या बीग बॉसेसना, मार्गदर्शकांना भेटून मी भारावून गेलोय." पुढच्या एका ट्विटमध्ये ते लिहितात की "हा फोटो माझ्या ड्राईंगरुममध्ये आयुष्यभर लावण्यासारखा आहे."
या फोटोत प्रियांका गांधीही आहेत, सिद्धूने बिग बॉस आणि मार्गदर्शक असे शब्द वापरल्याने नेटकऱ्यांनी सिद्धूला टोमणे मारले. प्रियांका गांधी या काँग्रेसच्या बिग बॉस कधीपासून झाल्या असा सवाल त्यांनी सिद्धूला विचारलाय. प्रियांका या मार्गदर्शक असतीलही पण त्या बिग बॉस कशा? असाही प्रश्न त्यांनी सिद्धूला विचारलाय.


प्रियांका या काँग्रेसमध्ये फारशा सक्रिय नसल्यातरी त्यांचं पक्षातल्या घडामोडींवर कायम लक्ष असतं. मध्य प्रदेश आणि राजस्थानमधल्या नेता निवडीच्या प्रसंगीही त्या काही बैठकांना उपस्थित होत्या. तर अनेकदा काँग्रेस कार्यकर्त्यांनी फलक लावून प्रियांका गांधींनी सक्रिय राजकारणात यावं असाही आग्रह धरला आहे.
सिद्धूचं ट्विट, आगामी लोकसभा निवडणुका आणि काँग्रेसपक्षाला असलेली आणखी एका स्टार नेत्याची गरज यामुळे प्रियांका गांधी सक्रीय राजकारणात उतरणार का याची पुन्हा नव्याने चर्चा होण्याची शक्यता आहे.


‏VIDEO: अवघ्या 2 तासांत बदललं चित्र, राफेल ऑडिओ क्लिपवरून लोकसभेत काँग्रेस बॅकफूटवर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 3, 2019 10:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...