भारत-पाक सीमेवर राहणारे लोक हादरले; म्हणाले, 'आम्हाला वाटलं युद्ध सुरू झालं'

भारत-पाक सीमेवर राहणारे लोक हादरले; म्हणाले, 'आम्हाला वाटलं युद्ध सुरू झालं'

LoC च्या जवळ राहणाऱ्या नागरिकांच्या सांगण्यानुसार, तब्बल 10 मनिटांपर्यंत लढाऊ विमानांचा जोरात आवाज येत होता. एलओसीजवळ राहणाऱ्या नागरिकांचं म्हणणं आहे की, येणारे दिवस आता धोक्याचे आहेत.'

  • Share this:

नवी दिल्ली, 26 फेब्रुवारी: जेव्हा भारतीय वायुसेनेच्या लढाऊ विमानानं हवाई हल्ला केला तेव्हा जम्मू-काश्मीरमध्ये लाइन ऑफ कंट्रोलजवळ राहणारे निसार अहमददेखील इतर नागरिकांसारखे घाबरले. पुंछच्या मेंढर सेक्टरमध्ये LoC जवळ राहणाऱ्या निसार अहमद म्हणाले की, 'बॉम्बच्या आवाजाने मी घाबरून गेलो. मला वाटलं युद्धचं सुरू झालं.'

निसार पुढे म्हणाले की, 'जेव्हा हल्ल्याचा मोठा आवाज आला तेव्हा आम्ही झोपलो होतो. आम्ही आमच्या लहान मुलांना जवळ घेतलं. आमच्या घरात प्रत्येक जण रडत होतं.'

LoC च्या जवळ राहणाऱ्या नागरिकांच्या सांगण्यानुसार, तब्बल 10 मनिटांपर्यंत लढाऊ विमानांचा जोरात आवाज येत होता. एलओसीजवळ राहणाऱ्या नागरिकांचं म्हणणं आहे की, येणारे दिवस आता धोक्याचे आहेत.' अहमद यांनी न्यूज 18 ला सांगितलं की, "एलओसीला बऱ्याचदा मोर्टारचा गोळीबार होत असतो आणि आम्हाला माहित आहे की हे संघर्ष विराम हे उल्लंघन आहे. आम्हाला याची सवय आहे, पण रात्री उडणारी आणि एलओसी ओलांडून लढाऊ विमान आमच्या हद्दीत येणं आमच्य़ासाठी नवीन आहे.'

हेही वाचा: सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं देश नहीं मिटने दूँगा - मोदींची प्रतिक्रिया

भारतीय हवाई दलानं घेतला पुलवामाचा बदला; Air Strikeमध्ये अझर मसूदचा मेव्हणा ठार?

पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतीय हवाई दलानं जैश ए मोहम्मदच्या तळाला लक्ष्य केलं. हवाई दलानं जैशच्या ज्या तलावर कारावाई केली तो तळ जैश ए मोहम्मदचा म्होरक्या अझर मसूदचा मेव्हणा मौलाना युसूफ अझर लीड करत होता. या हल्ल्यामध्ये 200 दहशतवादी ठार झाले असले तरी मौलाना युसूफ अझर ठार झाला की नाही? याबद्दल अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये भारतीय हवाई दलाच्या कारवाईबद्दल माहिती देण्यात आली.

असा झाला Air Srrike

पहाटे 3 वाजून 30 मिनिटांनी भारतीय वायु दलाच्या मिराज - 2000 या विमानांनी पाक व्याप्त काश्मीरमध्ये प्रवेश करत दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केलं. यामध्ये 200 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा केला. भारतीय वायु दलानं केलेल्या कारवाईमुळे दहशतवाद्यांना पळता भूई थोडी झाली. या हल्ल्यामध्ये 5 पाकिस्तानी सैनिक देखील ठार झाले. तर जखमींवर रूग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. 21 मिनिटं भारतीय हवाई दलानं केलेल्या बॉम्ब हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांच्या तळाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं.प्रत्युत्तरादाखल पाकनं भारतीय हवाई दलावर हल्ला केला. पण, भारतीय हवाई दलापुढे त्यांची डाळ शिजली नाही.

Air Strikeचा निर्णय मोदींचा

पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतीय हवाई दलानं केलेल्या कारवाईमध्ये 200 ते 300 दहशतवादी ठार झाल्याची माहिती सुत्रांनी दिली. दरम्यान, बालाकोट येथे Air strike करण्याचा निर्णय हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतल्याची माहिती न्यूज18च्या सुत्रांनी दिली. हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहशतवाद्यांना माफी नाही असा इशारा दिला होता. त्यानंतर 15 दिवसामध्ये ही कारवाई करण्यात आली.

 

First published: February 26, 2019, 3:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading