Home /News /national /

तौत्केनंतर 'यास'ची भीती; 24 तासात बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचा इशारा, दोन राज्यांना अलर्ट

तौत्केनंतर 'यास'ची भीती; 24 तासात बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचा इशारा, दोन राज्यांना अलर्ट

तौत्केनंतर यास हे चक्रीवादळही मोठा विध्वंस घडवू शकते. यामुळे 26 मे रोजी नागरिकांना इशारा देण्यात आला आहे.

    नवी दिल्ली, 22 मे : देशात 'तौत्के' चक्रीवादळानंतर आता ‘यास’ वादळाचा भीती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ‘यास’ वादळ भीषण चक्रीवादळात रुपांतरीत होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून (IMD) दिलेल्या माहितीनुसार, 26 मे रोजी यास चक्रीवादळ (Cyclone ‘Yaas’) ओडिसा-पश्चिम बंगालच्या समुद्रकिनाऱ्यावरुन जाणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे ओडिसा बरोबरच पश्चिम बंगालला अलर्ट जारी करण्यात आलं आहे. ओडिसा सरकारने 30 मेपासून 14 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. याशिवाय ओडिसा आणि पश्चिम बंगालमधील भारतीय नौदल आणि भारतीय (Navy) तट रक्षक दलालाही (Indian Coast Guard) अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विज्ञान विभागाने गुरुवारी सांगितलं होतं की, 22 मे रोजी बंगाल खाडीच्या पूर्व मध्य भागावर कमी दाबाचा पट्टी निर्माण होईल, जो चक्रीवादळाचं रुप घेऊ शकतो. आणि 26 मे रोजी ओडिसा-पश्चिम बंगालच्या तटांवर धडकू शकतो. अशा परिस्थितीत मच्छिमारांना समुद्राच्या तटापासून लांब राहण्याचा सल्ला दिला जातो. हे ही वाचा-अंदमानात मान्सून दाखल; येत्या 3 दिवसात पुण्यासह 'या' जिल्ह्यांत पाऊस यादरम्यान ओडिसाचे मुख्य सचिव एसपी मोहपात्रा यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत परिस्थिती हाताळण्यासाठी आपात्कालिन बैठकीचं आयोजन केलं. त्यांनी बैठकीत सांगितलं की, राज्य सरकार चक्रीवादळ ‘यास’ (Cyclone ‘Yaas’) च्या परिणामाशी दोन हात करण्यास तत्पर आहे. यासाठी बचाव दलाला अलर्ट देण्यात आलं आहे. याशिवाय ते पुढे असंही म्हणाले की, आतापर्यंत हवामान विभागाने चक्रीवादळासंदर्भात शक्यता, मार्ग, वेग, किनाऱ्याशी धडकण्याची जागा आदीबाबत माहिती दिलेली नाही. यासाठी वादळाचं नाव 'यास' ठेवलं येत्या 72 तासात भीषण वादळाचा रुप बदलून चक्रीवादळात रुपांतरित झालं तर त्याचं नाव Yaas असेल. हे नाव ओमानने दिलं आहे. ओमानने स्थानिक स्थानिक बोलीच्या आधारावर हे नाव दिलं आहे. यास याचा अर्थ निराश असा होता. देशाच्या पूर्व किनाऱ्यावर 26-27 मे दरम्यान चक्रीवादळाचा परिणाम पाहायला मिळू शकतो.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Cyclone, West bangal

    पुढील बातम्या