भारतात कोरोनाच्या नव्या उद्रेकाची भीती, पुढचे 2 महिने कठीण काळ

भारतात कोरोनाच्या नव्या उद्रेकाची भीती, पुढचे 2 महिने कठीण काळ

आत्तापर्यंत कोरोना आटोक्यात आहे. मात्र शहरांमधून परतणाऱ्या मजुरांच्या माध्यमातून तो ग्रामीण भागात जर पसरला तर काय करायचं असा प्रश्न सरकारला पडलाय.

  • Share this:

नवी दिल्ली 16 मे :  देशात कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वाढत आहे. बाधितांच्या संख्येने 80 हजारांचा आकडा पार केल्याने सरकारची चिंता वाढली आहे. त्यातच लॉकडाऊनमध्ये सुट मिळत असल्याने लोक आता जास्त प्रमाणात घराबाहेर येत आहेत. तर शहरांमधून मजूर लाखोंच्या संख्येने गावाकडे परतत असल्याने सरकारची चिंता आणखी वाढली आहे. आत्तापर्यंत कोरोना आटोक्यात आहे. मात्र शहरांमधून परतणाऱ्या मजुरांच्या माध्यमातून तो ग्रामीण भागात जर पसरला तर काय करायचं असा प्रश्न सरकारला पडलाय. त्यामुळे पुढचे दोन दिवस हे कसोटीचे असणार आहेत. त्या काळात जर कोरोनाला रोखण्यात यश मिळालं तर भारतात परिस्थिती आटोक्यात राहिल असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केलाय. तर अनेक शहरांमध्ये मजुरांचा उद्रेक होत असल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे. आता तर लॉकडाऊन 4.0ची घोषणाही करण्यात आली आहे.

लॉकडाऊन वाढतच असल्याने देशभर अडकलेल्या लाखो मजुरांना आपल्या घराकडे जायचं आहे. अनेक जण पायीच निघाले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून हे सत्र सुरूच आहे. मात्र काही दिवसांपूर्वीच सरकारने देशातल्या अनेक शहरांमधून मजुरांसाठी श्रमिक ट्रेन्स सुरू केल्या आहेत. त्यामुळे सगळ्यांना एक आशा निर्माण झाली होती. मात्र गुजरातमधल्या राजकोटमधून निघणाऱ्या दोन ट्रेन्स रद्द झाल्याने या मजुरांनी तुफान राडा केला. शेवटी पोलिसांना अश्रूधुराचा वापर करावा लागला.

गाड्या असल्यामुळे आपण आता घरी जावू अशी आस सगळ्या मजुरांना लागली होती. मात्र काही कारणांमुळे राजकोटहून बिहार आणि उत्तर प्रदेशात जाणाऱ्या दोन ट्रेन्स रद्द झाल्या. ही माहिती पसरताच या मजुरांचा संयम सुटला आणि त्यांनी तोडफोड करायला सुरूवात केली. काही मजूर हे रेड झोनमधले बॅरेकेट्स काढत असल्याने पोलिसांना लाढीमार करावा लागला.

संतप्त मजुरांनी गाड्या आणि दुकानांची तोडफोड केली. जमावाला पांगविण्यासाठी शेवटी पोलिसांनी अश्रूधुराची नळकांडी फोडली. तेव्हा कुठे जमाव शांत झाला. आता पुन्हा लॉकडाऊन वाढल्याने या मजुरांना थोपवणं हे प्रशासनापुढचं आव्हान ठरणार आहे.

कोरोनाव्हायरसचा (Coronavirus) प्रसार रोखण्यासाठी देशात राबवण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या (Lockdown) तिसर्‍या टप्प्यातील आज शेवटचा दिवस आहे. लॉकडाऊन असूनही, देशात कोरोना विषाणूची प्रकरणं झपाट्यानं वाढत आहेत. अशा परिस्थितीत काही राज्यांनी लॉकडाऊनचा पाठपुरावा करण्याचा निर्णय घेतला आहे. हे लक्षात घेता तामिळनाडू सरकारनंही (Tamil Nadu Government) 31 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली आहे. या काळात राज्यात निर्बंध लागू करण्यात येणार आहेत.

गरीब विक्रेत्याकडून खरेदी केले सर्व चपलांचे जोड; अनवाणी चालणाऱ्या मजुरांना दिले

काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित करत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली होती. ते म्हणाले की, हा टप्पा आतापर्यंतच्या तीन लॉकडाऊनपेक्षा पूर्णपणे वेगळा आणि अधिक सवलतींचा असेल. त्याअंतर्गत, आज गृह मंत्रालयाकडून मार्गदर्शक तत्त्वं जारी होण्याची अपेक्षा आहे.

घर गाठण्यासाठी कुटुंबासह 800 किमी केला होता प्रवास, लेकरांना भूक लागली म्हणून...

महाराष्ट्र (Maharashtra) सरकारनेही लॉकडाऊन कालावधी 31 मे पर्यंत वाढवला आहे. राज्य सरकारने 17 मे रोजी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत. केंद्र शासनाने आपत्ती अधिनियम 2005 अंतर्गत लॉकडाऊन कालावधी 17 मेपर्यंत वाढवला होता. हा कालावधी आज संपला असून आता पुढे लॉकडाऊनचा चौथा टप्पा लागू करण्यात आला आहे.

First published: May 17, 2020, 5:42 PM IST

ताज्या बातम्या