Fb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी

Fb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी

सध्या सगळ्यात जास्त वापरात येणारं सोशल नेटवर्किंग साईट फेसबुक आणि इन्स्टाग्राम बंद झालं आहे.

  • Share this:

मुंबई, 20 नोव्हेंबर : सध्या सगळ्यात जास्त वापरात येणारं सोशल नेटवर्किंग साईट फेसबुक आणि इन्स्टाग्राम बंद झालं आहे. फेसबुकचा मेसेजिंग अॅप Messenger देशभरात अनेक ठिकाणी ठप्प झाला आहे. अमेरिका आणि युरोपनंतर आता भारतातील युजर्संना फेसबुक चालवताना अडचणी येत आहे.

डाउन डिटेक्टर.कॉमच्या सांगण्यानुसार, हजारो मेसेंजर Messenger वापरणाऱ्यांना मेसेज पाठवण्यात आणि मेसेज रिसिव्ह करण्यात अडचणी येत आहेत. यात पोस्ट टाकतानाही अडचणी येत आहेत. नुकतंच मंगळवारी सकाळी काही तासांसाठी मेसेंजर सर्विस Restore करण्यात आली होती. त्यामुळे कदाचित हे फेसबुक आणि मेसेंजर ठप्प झालं असावं. पण अद्याप फेसबुकने अशी कोणतीही घोषणा केलेली नाही.

फेसबुकच्या मेसेंजरवर नवं फीचर ‘Delete thread’ रोल करण्यात आलं आहे. त्यामुळे ते ठप्प झालं असल्याचंही सांगण्यात येत आहे. ‘Delete thread’ फीचरमध्ये तुम्ही पाठवलेला मेसेज हा पुढच्या 10 मिनिटात डिलीट करू शकता.

त्याचबरोबर ‘Watch Videos Together’ असं आणखी एक नवं फीचर लवकरच लॉन्च करण्यात येणार आहे. त्यासाठी फेसबुकवर त्याची चाचणी सुरू आहे. यात आपण अनेक व्हिडिओ एकत्र पाहू शकतो. पण याच सगळ्यामुळे कदाचित फेसबुक आणि इन्स्टाग्राम ठप्प झालं असल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, सेक्योरिटी बगच्या नादात इन्स्टाग्राम वापरकर्त्यांचे पासवर्ड हे लीक झाले आहेत. त्यामुळे इन्स्टाग्रामचे नवे पासवर्ड सेट करा असं सांगण्यात आलं होतं. एकंदरीतच या सगळ्यामुळे सोशल मीडियावर सुरक्षा महत्त्वाची आहे हे लक्षात घ्या.

भयंकर VIDEO: एक वर्षाची मुलगी रेल्वे ट्रॅकवर पडली आणि समोरून आली एक्सप्रेस...!

First published: November 20, 2018, 8:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading