• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • 'भारतात इम्रान खान मोदींपेक्षा लोकप्रिय; दिल्लीत रॅली काढली तर...'; पाक मंत्र्याचा अजब दावा, VIDEO

'भारतात इम्रान खान मोदींपेक्षा लोकप्रिय; दिल्लीत रॅली काढली तर...'; पाक मंत्र्याचा अजब दावा, VIDEO

फवाद चौधरी यांनी दावा केला आहे की भारतात इम्रान खान (Fawad Chaudhry on Imran Khan's Popularity) यांची लोकप्रियता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा जास्त आहे

 • Share this:
  इस्लामाबाद 24 ऑक्टोबर : पाकिस्तानातील नेत्यांची बेताल विधानं दिवसेंदिवस वाढत आहे. आता पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनी दावा केला आहे की भारतात इम्रान खान (Fawad Chaudhry on Imran Khan's Popularity) यांची लोकप्रियता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा जास्त आहे (Imran Khan is Popular in India). इम्रान खानने दिल्लीत रॅली काढली तर त्यात पंतप्रधान मोदींपेक्षा (PM Narendra Modi) जास्त गर्दी जमेल, असेही ते म्हणाले. 26 दहशतवाद्यांचं SHIFTING, काश्मीरवरून थेट आग्रा तुरुंगात रवानगी पीएम मोदींच्या वृत्तीमुळे पाकिस्तान आणि भारतातील संबंध सुधारले नाहीत, असा आरोप फवाद चौधरी यांनी केला. अन्यथा, इम्रान खान या क्षणी सामान्य भारतीयांमध्ये इतके लोकप्रिय आहेत, की आज त्यांनी दिल्लीत रॅली काढली तर नरेंद्र मोदींपेक्षा जास्त गर्दी जमवू शकतील, असंही त्यांनी म्हटलं. यावेळी भारतात असलेली इम्रान खान यांची लोकप्रियता ही पाकिस्तान आणि भारत यांच्यातील संबंध सुधारण्याची मोठी संधी होती. मात्र, नरेंद्र मोदींमुळे आपण हे करू शकलो नाही, असा आरोपही त्यांनी केला. पाकिस्तानात ऑगस्ट महिन्यात लाहोर किल्ल्यातील महाराजा रणजीत सिंह यांचा पुतळा तोडल्यानंतरही फवाद चौधरी संतापले होते. एका धर्मांधाने मूर्ती पाडल्याचा व्हिडिओ रिट्विट करत त्यांनी लिहिलेलं की, लज्जास्पद, निरक्षरांचा हा समूह खरोखरच पाकिस्तानच्या प्रतिमेसाठी जगात धोकादायक आहे. फवाद चौधरी हे इम्रान खान यांचे निकटवर्तीय मानले जातात. आपल्या विधानांमुळे ते अनेकवेळा टीकेचा धनी ठरतात. 9 महिन्यांचा 100 कोटींपर्यंतचा प्रवास: भगीरथ प्रयत्न आणि लोकसहभागातून केलं अशक्य इम्रान खान आपल्या लोकांमध्‍ये भारताशी शत्रुत्वाचा आव आणतात, पण आतून ते भारतासोबत बोलण्‍यासही खूप उत्सुक आहेत. त्यांनी स्वत: भारताशी अनेकदा चर्चेची मागणी केली आहे. भारताने जम्मू -काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर इम्रान खान यांनी अनेकवेळा चर्चेचे आवाहन केले आहे. भारताला कलम 370 पुन्हा लागू करावं लागेल, अशी अट त्यांनी प्रत्येक वेळी ठेवली होती.
  Published by:Kiran Pharate
  First published: