IPS अधिकाऱ्याने वडिलांचा मृतदेह महिनाभर ठेवला घरात, जिवंत करण्यासाठी...

IPS अधिकाऱ्याने वडिलांचा मृतदेह महिनाभर ठेवला घरात, जिवंत करण्यासाठी...

रुग्णालयाने 14 जानेवारीला त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाल्याचे घोषित केलं आहे.

  • Share this:

भोपाळ, 14 फेब्रुवारी : एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने आपल्या वडिलांचा मृतदेह एक दोन दिवस नव्हे तर तब्बल महिनाभर घरात ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील आयपीएस अधिकारी राजेंद्र कुमार मिश्रा यांनी वडिलांचा मृतदेह घरात ठेवून त्यावर आयुर्वेदीक उपचाराचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

आयपीएस अधिकारी राजेंद्र कुमार यांच्या वडिलांचा मृत्यू घोषित केलं होतं याला भोपाळ शहरातील एका खाजगी रुग्णालयाने दुजोरा दिला आहे. तर राजेंद्र कुमार यांनी मात्र अजुनही वडिलांवर उपचार सुरू असल्याचे म्हटलं आहे.

भोपाळमध्ये राहणाऱ्या राजेंद्र यांच्या 84 वर्षीय वडिलांना 13 जानेवारीला एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांचा मृत्यू धाला होता. रुग्णालय प्रशासनाने राजेंद्र मिश्रांच्या वडिलांचा मृत्यूचा दाखलाही दिला आहे.

याबाबत रुग्णालयातील डॉक्टर अश्वनी मल्होत्रा यांनी सांगितले की, रुग्णालयात दाखल केल्यानंतर दुसऱ्या दिवशी 14 जानेवारीला मिश्रांच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. त्यांना किडनीचा, हृदयाचा विकार होता. त्याचबरोबर वयोमानानुसार इतरही आजार झाले होते.

भोपाळमधील रुग्णालयाने सांगितले की, 14 जानेवारीला आयपीएस मिश्रा त्यांच्या वडिलांचा मृतदेह घेऊन गेले आहेत. जर मिश्रा यांनी रुग्णालयावर आरोप केल्यास आम्ही कोर्टात जाऊ असे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

राजेंद्र कुमार मिश्रा यांचा वडिलांचे निधन झालं आहे यावर विश्वास नसल्याचे म्हटले जात आहे. त्यांच्यावर आयुर्वेदीक उपचार सुरू असल्याचा दावा मिश्रांनी केला आहे. त्यांची परिस्थिती गंभीर असल्याचंही मिश्रा यांचं म्हणणं आहे. या प्रकारामुळे घरातून दुर्गंधी येत असून एसएएफचे दोन जवान आजारी पडल्याचे सांगितले जात आहे. गेल्या महिन्याभरापासून मृतदेतह घरात ठेवण्याचे कारण काय? जर वडील जिवंत आहेत तर रुग्णालयाने मृत घोषित केल्यानंतर आयपीएस अधिकारी गप्प का? यासह अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 14, 2019 08:25 AM IST

ताज्या बातम्या