अमरोही (उत्तर प्रदेश) : बरेलीच्या भाजप आमदारांच्या मुलीचा दलित मुलाशी लग्न करण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ माजली होती. आता आणखी एका तरुणीने असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. बीएससी करणाऱ्या या मुलीने घरून पळून जाऊन आर्य समाज मंदिरात लग्न केलं. माझ्या घरच्यांकडूनच माझ्या जीवाला धोका आहे, असं या मुलीने म्हटलं आहे.
घरच्यांच्या जीवाला धोका
उत्तर प्रदेशच्या अमरोहीमधली ही घटना आहे. या तरुणीने आपण दुसऱ्या जातीतल्या मुलाशी लग्न केल्याबद्दल सांगितलं आहे. तिचाही हा व्हिडिओ सोशल मीडियावर फिरतो आहे. या व्हिडिओमध्ये ही मुलगी पोलिसांचं संरक्षण मागते आहे. आपल्या कुटुंबीयांकडून आपल्याला धोका असल्यामुळे पोलिसांनी आपल्याला मदत करावी, असं तिचं म्हणणं आहे. माझ्या सासरच्यांना काही झालं तर त्याला माझ्या घरचे जबाबदार असतील, असंही तिने व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.
'तर मुसलमान होईन'
दुसरीकडे मात्र या मुलीच्या वडिलांनीही तिच्या सासरच्यांवर उलटे आरोप केले आहेत. माझ्या मुलीचा छळ केला जातोय आणि तिच्याकडून जबरदस्तीने व्हिडिओ रेकॉर्ड केले जात आहेत, असं त्यांचं म्हणणं आहे. जर माझी मुलगी 2 दिवसांत आमच्या ताब्यात आली नाही तर मी आत्महत्या करेन, असा इशारा त्यांनी दिला. एवढंच नव्हे तर मी आत्महत्या करू शकलो नाही तर मुसलमान बनेन, अशी धमकी त्यांनी दिली आहे.
'पश्चिम बंगालमध्ये 107 आमदार आमच्या संपर्कात', भाजपचा दावा
==========================================================================================
<iframe class="video-iframe-bg-color iframe-onload" onload="resizeIframe(this)" id="story-390579" scrolling="no" frameborder="0" width="100%" src="https://lokmat.news18.com/embed/videos/MzkwNTc5/"></iframe>