मराठी बातम्या /बातम्या /देश /

SAD! एकाच घरातील तिघांचा करुण अंत, लेकींचे अश्रू थांबता थांबेनात

SAD! एकाच घरातील तिघांचा करुण अंत, लेकींचे अश्रू थांबता थांबेनात

एकाच कुटुंबातील तिघांचा एका विचित्र (Father, son and daughter dies in an incident) घटनेत मृत्यू झाल्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

एकाच कुटुंबातील तिघांचा एका विचित्र (Father, son and daughter dies in an incident) घटनेत मृत्यू झाल्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

एकाच कुटुंबातील तिघांचा एका विचित्र (Father, son and daughter dies in an incident) घटनेत मृत्यू झाल्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

  • Published by:  desk news

भुवनेश्वर, 8 ऑगस्ट : एकाच कुटुंबातील तिघांचा एका विचित्र (Father, son and daughter dies in an incident) घटनेत मृत्यू झाल्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वडिल, मुलगा आणि मुलगी या तिघांचे मृतदेह जेव्हा घरी आले, तेव्हा कुटुंबातील इतर (grief of losing father and siblings) दोन मुलींनी हंबरडा फोडला. आपल्या वडिलांना, भावाला आणि बहिणीला नेमकं झालंय तरी काय, हेच कुणाला कळेना. त्यांचं दुःख पाहून गावातील सर्वांच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले.

अशी घडली दुर्घटना

झारखंडमधील राजधनवार प्रखंड भागातील रहिवासी असणारे अल्ताफ हे कामानिमित्त ओडिशातील संबलपूरमध्ये राहत होते. तिथल्या एका हॉटेलमध्ये वेटरचं काम करून ते आपला चरितार्थ चालवत होते. काही महिन्यांपूर्वी त्यांनी मुलगा आफताब आणि मुलगी मुन्नी यांना शिक्षणासाठी बोलावून घेतलं होतं. त्यांच्या इतर दोन मुली मूळ गावीच राहत होत्या.

पाणी नसल्यामुळे नदीवर अंघोळ

गेल्या दोन दिवसांपासून वीज नसल्यामुळे नळाला पाणी आलं नव्हतं. घरात अंघोळीसाठी पाणी नसल्यामुळे या तिघांनी नदीवर जाऊन अंघोळ करण्याचा निर्णय घेतला. नदीत अंघोळ करत असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढला. हीराकुंड धरणातून त्याच वेळी पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. अल्ताफ यांना या गोष्टीची कल्पना नव्हती. अल्ताफ हे दोन मुलांसोबत अंघोळ करत असतानाच धरणातून पाण्याचा विसर्ग झाल्यामुळे काही मिनिटांत नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली. या पाण्यात मुन्नी वाहून जाऊ लागली. तिला वाचवण्यासाठी अल्ताफ यांनी तिच्याकडे झेप घेतली. मात्र तिला ते वाचवू शकले नाही. तिला वाचवण्याच्या प्रयत्नात अल्ताफ हेच पाण्यात बुडाले.

अल्ताफ आणि मुन्नीला वाचवण्यासाठी 14 वर्षांच्या आफताबनं पाण्यात उडी घेतली आणि दोघांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. मात्र पाण्याच्या जोरदार वेगामुळे त्याचाही टिकाव लागू शकला नाही. तिघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.

हे वाचा - साताऱ्यात दिवसाढवळ्या हत्येचा थरार; टोळक्यानं भररस्त्यात तरुणाला दगडानं ठेचलं

दुःखाचा डोंगर

पोलिसांनी आफताब आणि अल्ताफ यांचे मृतदेह 2 तासात शोधून काढले, तर मुन्नीचा मृतदेह मिळायला 14 तास लागले. त्यानंतर सर्व मृतदेहांचं पोस्टमॉर्टेम करून ते त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात आले. या घटनेनं कुटुंबातील इतर दोन मुलींना जबर धक्का बसला असून त्यांचे अश्रूच थांबायला तयार नाहीत.

First published:

Tags: Accident, Death, Jharkhand, Odisha