मराठी बातम्या /बातम्या /देश /

Making of Real Pilot! लेकीला खुणावत होतं आकाश, वडिलांनी जमीन विकून केलं स्वप्न पूर्ण

Making of Real Pilot! लेकीला खुणावत होतं आकाश, वडिलांनी जमीन विकून केलं स्वप्न पूर्ण

 लेकीचं पायलट (commercial pilot) बनायचं स्वप्न तिच्या आईवडिलांनी स्वतःची जमीन (Land) विकून पूर्ण केलं.

लेकीचं पायलट (commercial pilot) बनायचं स्वप्न तिच्या आईवडिलांनी स्वतःची जमीन (Land) विकून पूर्ण केलं.

लेकीचं पायलट (commercial pilot) बनायचं स्वप्न तिच्या आईवडिलांनी स्वतःची जमीन (Land) विकून पूर्ण केलं.

  • Published by:  desk news

सूरत, 25 ऑगस्ट : लेकीचं पायलट (commercial pilot) बनायचं स्वप्न तिच्या आईवडिलांनी स्वतःची जमीन (Land) विकून पूर्ण केलं. वडिलांचा हा त्याग लक्षात ठेवत मुलीनेदेखील सर्वात कमी कालावधीत (in less months) आपलं कमर्शिअल पायलटचं ट्रेनिंग पूर्ण केलं. सर्वात कमी वयात पायलट होण्याच विक्रम नोंदवतानाच तिनं आपल्या आईवडिलांच्या मेहनतीचं चीज केलं.

स्वप्न आणि त्यागाची कहाणी

गुजरातमधील सूरतमध्ये राहणारे कांतीभाई पटेल आणि रेखा पटेल यांची लेक मैत्री हिला पायलट व्हायचं होतं. अगदी 8 वर्षांची असल्यापासूनच तिनं पायलट होण्याचं स्वप्न बाळगलं होतं आणि ते आईवडिलांना सांगितलंही होतं. त्यामुळे बारावीची परीक्षा पास होताच अमेरिकेला जाऊन कमर्शिअल पायलट होण्याचा तिचा प्लॅन होता. मात्र त्यासाठी लागणारे पैसे कांतीभाईंकडे नव्हते. पैशाची जमवाजमव कशी करायची या विवंचनेत ते काही दिवस होते.

बँकेने दिला नकार

बँकेतून कर्ज घेऊन मुलीला कमर्शिअल पायलटच्या प्रशिक्षणाला पाठवावं, असा विचार करून ते अनेक बँकांकडे गेले. मात्र त्यांना गरज असलेल्या कर्जाची रक्कम मोठी होती आणि त्या तुलनेत तारण ठेवण्याएवढी मालमत्ताही त्यांच्याकडे नव्हती. त्यामुळे प्रत्येक बँकेत त्यांच्या पदरी निराशाच आली. मात्र बँकेनं कर्ज नाकारलं तरी मुलीचं स्वप्न उद्ध्वस्त होऊ द्यायचं नाही, हा चंग त्यांनी मनाशी बांधला होता.

जागा विकली आणि उभे केले पैसे

अखेर त्यांनी स्वतःच्या नावे असणारी जमीन विकून लेकीच्या शिक्षणासाठी पैसा उभा केला. या पैशातून मैत्री अमेरिकेला कमर्शिअल पायलटचं शिक्षण घेण्यासाठी गेली. वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी तिने पायलटचे प्रशिक्षण पूर्ण केले आणि ती भारतात परतली. पायलट होऊन परतलेल्या लेकीचा पटेल कुटुंबीयांना सार्थ अभिमान आहे. आपल्या कष्टाचं चीज झाल्याची भावना ते व्यक्त करत आहेत.

हे वाचा -मोठी बातमी! तालिबानसोबत मोदी सरकार करणार चर्चा? देशहित लक्षात घेऊन होणार निर्णय

विक्रमी वेळेत ट्रेनिंग पूर्ण

साधारणतः कमर्शिअल पायलट होण्यासाठीचं ट्रेनिंग पूर्ण करायला 18 महिने लागतात. अनेकांना 18 महिन्यांतही हे प्रशिक्षण पूर्ण करणं शक्य होत नाही. मात्र मैत्रीनं केवळ 11 महिन्यांत हे प्रशिक्षण पूर्ण केलं आहे. त्यामुळे सर्वात कमी वयाची पायलट होण्याचा विक्रमही तिच्या नावे जमा झाला आहे.

First published:

Tags: Daughter, Father, Gujrat