Home /News /national /

माझ्या मुलीचे पाय तोडा, 'पाकिस्तान जिंदाबाद' घोषणा देणाऱ्या तरुणीच्या वडिलांची प्रतिक्रिया

माझ्या मुलीचे पाय तोडा, 'पाकिस्तान जिंदाबाद' घोषणा देणाऱ्या तरुणीच्या वडिलांची प्रतिक्रिया

ओवेसी यांच्या कार्यक्रमात व्यासपीठावर पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्याचा प्रकार घडला होता

    बंगळुरू, 21 फेब्रुवारी : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) चे सर्वेसर्वा असादुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्या कार्यक्रमात व्यासपीठावर पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्याचा प्रकार घडला होता. अमुल्या लिओना नावाच्या तरुणीने व्यासपीठावर जाऊन घोषणा दिल्या होत्या. या प्रकरणी तिच्या वडिलांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. चिकमगलूरमधील कोप्पा इथं राहणाऱ्या अमुल्या लिओनाच्या वडिलांनी आपल्या मुलीच्या कृत्यावर नाराजी व्यक्त करत म्हटलं की, "माझ्या मुलीला जेलमध्ये खितपत राहू द्या, पोलिसांना जर योग्य वाटत असेल तर तिचे पायही तोडून टाका." अमुल्याची त्यांनी अनेक वेळा समजूत काढली होती. पण तिने त्यांचं ऐकलं नाही. 'तिला माफ करणार नाही' अमुल्याने CAA रॅलीमध्ये जे काही केलं ते अयोग्य होतं. तिचे हे कृत्य माफ करण्या लायक नाही. मी तिला अनेक वेळा या आंदोलनापासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. पण तिने माझं काही ऐकलं नाही. मी ह्रदयविकाराचा रुग्ण आहे. काल रॅलीला जाण्याआधी तिने माझ्या तब्येतीची विचारपूस केली होती. त्यानंतर ती घरातून निघून गेली. आमच्यात काहीही बोलणं झालं नाही, असंही तिच्या वडिलांनी सांगितलं. दरम्यान, ओवेसींच्या कार्यक्रमात  घडलेल्या प्रकरानंतर बंजरग दलाचे काही स्थानिक कार्यकर्ते अमुल्याच्या घरी पोहोचले होते. त्यांनी तिच्या वडिलांना घेराव घालून जाब विचारला होता. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. बंगळुरात नेमकं काय घडलं? CAA-NRC विरोधात ऑल इंडिया मजलिस-ए- इत्तेहादुल मुसलमीन अर्थात AIMIM चे अध्यक्ष असादुद्दीन ओवेसी यांच्या सभेत गुरुवारी गोंधळ उडाला. या सभेत असादुद्दीन ओवेसी भाषण करण्यासाठी उभे राहिले असता अमूल्याने व्यासपीठावर माईक हातात घेऊन 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा दिल्या. तिला रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र, तिने तिचे बोलणे सुरूच ठेवले होते. तरुणीने व्यासपीठावर येत तुम्हाला 'पाकिस्तान जिंदाबाद, हिंदुस्थान जिंदाबाद फरक सांगते', असे सांगत 'पाकिस्तान जिंदाबाद, हिंदुस्थान जिंदाबाद' अशा घोषणा दिल्या. तातडीने संबंधित तरुणीला व्यासपीठावरून खाली उतरवण्यात आले. त्यावर असदुद्दीन ओवेसी म्हणाले, 'भारत जिंदाबाद था और रहेगा', आम्ही 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणेचे समर्थन करत नाही. या प्रकरणी पोलिसांनी तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केलाय. अटकेनंतर तिला कोर्टात हजर करण्यात आलंय. कोर्टाने तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अमुल्या ही सेव्ह कॉन्स्टिट्यूशन नामक संस्थेतर्फे तिला व्यासपीठावर बोलण्यासाठी बोलावण्यात आलं होतं.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Caa, NRC

    पुढील बातम्या