VIDEO : 'माझा मुलगा लढत राहील तुम्ही फक्त...', राहुल गांधींवर भडकले जखमी जवानाचे पिता

VIDEO : 'माझा मुलगा लढत राहील तुम्ही फक्त...', राहुल गांधींवर भडकले जखमी जवानाचे पिता

कॉंग्रेस नेता राहुल गांधी यांनी गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षावरून मोदी सरकारला सुनावले होता. मात्र गलवान खोऱ्यातील संघर्षात जखमी झालेल्या एका जवानाचे पिता राहुल गांधींवर भडकले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 20 जून : लडाखमधील गलवान खोऱ्यात (Gallwan Vally) भारत आणि चीनमध्ये संघर्ष झाला. यात भारताचे 20 जवान शहीद झाले तर 80 हून अधिक जखमी झाले. त्यानंतर चीननं गलवान खोरं आमचा भाग असल्याचा दावा केला. भारतीय सैन्यानं सीमारेषा ओलांडल्याचा आरोपही चीननं भारतीय सैन्यदलावर केला होता. यासगळ्या प्रकरणानंतर कॉंग्रेस नेता राहुल गांधी यांनी गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षावरून मोदी सरकारला सुनावले आहे. राहुल गांधी यांनी ट्वीट करत मोदी सरकारला काही प्रश्न विचारले. मात्र राहुल गांधींच्या या प्रश्नांवर गलवान खोऱ्यातील संघर्षात जखमी झालेल्या एका जवानाचे पिता भडकले आहेत. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या व्हिडीओमध्ये जवानाचे पिता कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विधानाला उत्तर देत आहेत. व्हिडीओमध्ये ते असे म्हणत आहेत की, "भारतीय सेना सर्वात मजबूत आहे. ते चीनला हरवू शकतात. राहुल गांधी, यात राजकारण करू नका... माझा मुलगा सैन्यासाठी लढत होता आणि तो कायम लढत राहील". हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राहुल गांधीच्या विधानावर टीका केली जात आहे.

याआधी राहुल गांधी यांनी शुक्रवारी गलवान खौऱ्यात भारत आणि चीन यांच्यात झालेल्या चकमकीवरून भारत सरकारवर निशाणा साधला. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की हे आता स्पष्ट झाले आहे की: 1. गलवानमध्ये चिनी हल्ला पूर्व नियोजित होता. 2. भारत सरकार झोपेत होते आणि त्यांनी ही समस्या नाकारली होती. 3. आमच्या शहीद जवानांना याची किंमत मोजावी लागली.

15 जूनच्या रात्री गलवान खोऱ्यात चीन आणि भारतीय सैन्य यांच्यात चकमक झाली. यात 40 हून अधिक चीनी सैनिक जखमी झाले किंवा ठार झाले, याबाबत चीननं काहीही माहिती दिलेली नाही आहे. नुकताच चीननं गलवान खोरं आमचा भाग असल्याचा दावा केला. भारतीय सैन्यानं सीमारेषा ओलांडल्याचा आरोपही चीननं भारतीय सैन्यदलावर केला आहे. तर भारतीय सैन्य आपल्या सीमा रेषेचं संरक्षण कोणत्याही परिस्थित करेल आणि येणाऱ्या स्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज असल्याचा इशाराही आर. के. एस भदौरिया यांनी दिला आहे.

संपादन-प्रियांका गावडे.

First published: June 20, 2020, 10:50 AM IST

ताज्या बातम्या