• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • मुलीच्या कमाईवर जगणाऱ्या जावयाचा खेळ खल्लास; सासऱ्याने आधी डोक्यात केला वार मग तोडले पाय

मुलीच्या कमाईवर जगणाऱ्या जावयाचा खेळ खल्लास; सासऱ्याने आधी डोक्यात केला वार मग तोडले पाय

Murder News: बायकोला कामाला लावून स्वत: घरी बसून खाणाऱ्या तरुणाची सासऱ्यानं निर्घृण हत्या (father in law murdered son in law) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

 • Share this:
  रांची, 22 नोव्हेंबर: बायकोला कामाला लावून स्वत: घरी बसून खाणाऱ्या तरुणाची सासऱ्यानं निर्घृण हत्या (father in law murdered son in law ) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नोकरीसाठी परराज्यात गेलेली मुलगी दोन वर्षांपासून घरी आली नाही, या रागातून सासऱ्यानं आपल्या घरजावयाची निर्घृण हत्या केली आहे. आरोपीनं आपल्या जावयाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून त्याचे पाय धडापासून वेगळे केले (Attack with sharpen weapon and cut legs) आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. घटनास्थळावरील खुनी थरार पाहून पोलिसांना देखील धक्का बसला आहे. सफल हंसदा असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर हडमा किस्कू असं हत्या करणाऱ्या सासऱ्याचं नाव आहे. आरोपी सासरा आणि मृत जावई दोघंही झारखंडमधील साहेबगंज जिल्ह्यातील रचरा गावात एकाच घरात वास्तव्याला होते. आरोपी सासरा हडमा यांनी काही वर्षांपूर्वी बोरीओ संथाली येथील सफल हंसदा या तरुणाशी आपल्या मुलीचा विवाह लावून दिला होता. लग्नानंतर सफल हा सासऱ्यांच्या घरीच घरजावई म्हणून राहत होता. दरम्यान, मृत जावयानं आपल्या बायकोला नोकरीसाठी झारखंडहून केरळला पाठवलं होतं. हेही वाचा-सायकल चोरून पळाला चोर; मालकाने अशी घडवली अद्दल, CCTV मध्ये कैद झाली घटना, VIDEO बायकोला कामाला लावून जावई घरी आयतं खातो, यामुळे सासऱ्याला आपल्या जावयावर राग होता. तसेच मुलगी नानामय नोकरीसाठी केरळला गेल्यापासून एकदाही घरी परतली नव्हती. याचा राग मनाात धरुन सासरा हडमा किस्कू यानं जावयाची चांगलीच खरडपट्टी काढली. यानंतर वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपी सासऱ्यानं आपल्या जावयाच्या डोक्यात धारदार शस्त्राने घाव घातला. पहिल्याचं घावात जावई जमिनीवर कोसळला. हेही वाचा-बिअर पाजली अन् नंतर वाहिला रक्ताचा पाट, सराईत गुन्हेगाराला स्मशानभूमीजवळच संपवलं यानंतर, आरोपी सासऱ्याचा राग कमी झाला नाही. त्यामुळे त्यानं धारदार शस्त्राने आपल्या जावयाचे पाय धडावेगळे केले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, आरोपीला अटक केली आहे. तसेच घटनास्थळावरून मृत जावयाचे तुटलेले पायही जप्त केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास बोरिओ पोलीस करत आहेत.
  Published by:News18 Desk
  First published: