Home /News /national /

Online अभ्यासासाठी वडिलांनी दिला मोबाईल, मुलाने 'PubG'मध्ये उडवले चक्क 16 लाख!

Online अभ्यासासाठी वडिलांनी दिला मोबाईल, मुलाने 'PubG'मध्ये उडवले चक्क 16 लाख!

अनेक सरकारी संस्थांनी PUBGवर बंदी घालायची मागणी केलीय. याचं अनेकांना वेड लागतं आणि ते जिवावर बेततं.

अनेक सरकारी संस्थांनी PUBGवर बंदी घालायची मागणी केलीय. याचं अनेकांना वेड लागतं आणि ते जिवावर बेततं.

'मुलांच्या हाती मोबाईल देतांना पालकांनीच काळजी घेतली पाहिजे. आपली मुलं त्यावर काय करतात याची माहिती त्यांनी सतत घेतली पाहिजे.'

    नवी दिल्ली 4 जुलै: कोरोनामुळे (Coronvirus) देशभरातल्या शाळा बंद आहेत. मात्र अनेक शाळांचे Online अभ्यासक्रम सुरू झाले आहेत. त्यामुळे पालक आपले मोबाईल मुलांना अभ्यासासाठी देत आहेत. त्यामुळे अभ्यासाचा बनाव करणाऱ्या एका मुलाचा प्रताप उघडकीस आला आणि पालकांचे डोळेच पांढरे झाले. त्याने ‘पब्जी गेम’ खेळत (PubG Game) वडिलांच्या खात्यातून चक्क 17 लाख लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. सगळ्याच मुलांना मोबाईलचं प्रचंड वेड आहे. तासं तास मुलं मोबाईल घेऊन असतात अशी पालकांची तक्रार असतो. मोबाईलची उपयोगीता सगळ्यांच्या लक्षात आल्याने आता प्रत्येकाकडेच मोबाईल आहे. आता तर शाळाच मोबाईवर सुरू असल्याने मुलांच्या हातात दिवसभरात काही तास मोबाईल हक्काचा झाला आहे. पंजाबमधल्या या 17 वर्षांच्या मुलाने पालकांचा मोबाईल घेऊन अभ्यास नाही तर खेळात मन घातलं. त्याने PubG डाउनलोड करून तो मित्रांसोबत हा गेम खेळत होता. त्याचं वेडच लागल्याने तो त्यावर पैसेही उडवत होता. त्याच मोबाईलमध्ये त्याच्या पालकांचे तीन बँकेंचे मोबाईल Apps डाऊनलोड केले होते. मुलाला त्याचे पासवर्डही माहित होते. 'तो देखावा नव्हे' मोदींविरुद्धच्या #MunnaBhaiMBBS टॅगवर लष्कराचं स्पष्टीकरण त्यामधूनच त्याने हे पैसे खेळात मित्रांसोबत उडवले. व्यवहार झाल्यानंतर तो आलेले SMS लगेच Delete करत होता. त्यामुळे पालकांना काही दिवस ते कळालेच नाही. नंतर  त्याच्या वडिलांनी जेव्हा आपली अकाऊंट्स चेक केली त्यानंतर त्यांना सगळा प्रकार लक्षात आला. कोरोनानं गेली फाईव्ह स्टारची नोकरी, मातीच्या 'ओव्हन'मध्ये करून विकत आहेत पिझ्झा या आधाही पब्जी खेळात वेडे झालेल्या मुलांच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे मुलांच्या हाती मोबाईल देतांना पालकांनीच काळजी घेतली पाहिजे. आपली मुलं त्यावर काय करतात याची माहिती त्यांनी सतत घेतली पाहिजे असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. संपादन - अजय कौटिकवार      
    First published:

    Tags: Online game, Pubg game, Punjab news

    पुढील बातम्या