मराठी बातम्या /बातम्या /देश /एकीकडे मुलाचा जन्म, तर दुसरीकडे वडिलांचा अपघाती मृत्यू, थोरल्या मुलीकडून अंत्यसंस्कार

एकीकडे मुलाचा जन्म, तर दुसरीकडे वडिलांचा अपघाती मृत्यू, थोरल्या मुलीकडून अंत्यसंस्कार

सोर्स : गुगल

सोर्स : गुगल

राजू हा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. ड्रायव्हिंग करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असे. राजूरामच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई 30 जानेवारी : जीवनात काहीवेळा विचित्र प्रसंगाला तोंड द्यावं लागतं. असाच काहीसा प्रसंग राजस्थानमध्ये घडला. एका ड्रायव्हरची पत्नी गरोदर होती. तीन मुलींनंतर मुलगा व्हावा, अशी या कुटुंबाची इच्छा होती. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. एका अपघातात या ड्रायव्हरचा मृत्यू झाला. या घटनेनंतर 11 तासांनी त्याच्या पत्नीने मुलाला जन्म दिला. आपल्या मुलाचं तोंड पाहण्यासाठी पिता मात्र हयात नव्हता. या वेळी कुटुंबातील थोरल्या मुलीने तिच्या पित्याच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

  जोधपूरपासून सुमारे 90 किलोमीटर अंतरावर एका ट्रेलर आणि कारची जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह चालकाचा मृत्यू झाला. ड्रायव्हर राजूराम देवासीच्या मृत्यूनंतर 11 तासांनी त्याच्या पत्नीने रुग्णालयात मुलाला जन्म दिला.

  हे ही पाहा : Viral Video : पाण्यावर अचानक धावू लागला कुत्रा, पाहून नेटकऱ्यांना फुटला घाम

  राजूरामची पत्नी शिपुदेवीने सांगितलं, ``मी माझ्या पतीची वाट पाहात होते, पण ते परतले नाहीत.`` मुलाच्या जन्मानंतर काही तासांनी तिला पतीचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याची बातमी सांगण्यात आली. पतीच्या निधनामुळे शिपुदेवीची रडून वाईट अवस्था झाली आहे.

  राजू हा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. ड्रायव्हिंग करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असे. राजूरामच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

  जोधपूरपासून सुमारे 90 किलोमीटर अंतरावर झालेल्या रस्ते अपघातात सेनाणी येथील रहिवासी हेड कॉन्स्टेबल तेजाराम (वय 35), भावंडा येथील कंकडाय पोलीस स्टेशन क्षेत्रातील रहिवासी कॉन्स्टेबल मोहनलाल याच्यासह दोन अन्य कॉन्स्टेबल शनिवारी संध्याकाळी एका खाजगी कारमधून आरोपींना पकडण्यासाठी नागौर येथे जात होते. ही कार आसोप येथील रहिवासी राजूराम देवासी (वय 38) चालवत होता.

  आसोपपासून दीड किलोमीटर अंतरावर समोर येणाऱ्या ट्रेलरने कारला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात तेजाराम, मोहनलाल आणि राजूरामचा मृत्यू झाला. तसेच अन्य दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले. पोलिसांनी घटनास्थळी ग्रीन कॉरिडॉर तयार करून जखमींना जोधपूर रुग्णालयात पोहोचवले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

  हे ही पाहा : ऑपरेशन थिएटरमध्ये रुग्णाला सोडून आपापसात भांडू लागले डॉक्टर, Live Footage समोर

  दरम्यान, पतीच्या निधनामुळे शिपुदेवीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ती रुग्णालयात मुलाला कुशीत घेत पतीचा फोटो पाहत अश्रू ढाळत आहे. शिपु देवीने सांगितलं, ``मला तीन मुली आहेत. त्यामुळे मुलगा व्हावा अशी आमची इच्छा होती. पण मुलाचं तोंड न पाहताच त्यांनी या जगाचा निरोप घेतला.`` राजू आणि शिपुचा विवाह 12 वर्षांपूर्वी झाला होता. त्यांना 11 वर्षांची दिलखुश, 7 वर्षाची डिंपल आणि 1 वर्षाची रिना अशा तीन मुली आहेत. रविवारी दिलखुशने तिच्या वडिलांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला.

  ``नातवाच्या जन्मापूर्वीच मी माझा मुलगा गमावला आहे,`` असं राजूच्या वृद्ध आईनं सांगितलं. या घटनेमुळं संपूर्ण गावात शोककळा पसरली असून कुटुंबापुढे मोठं संकट निर्माण झालं आहे.

  First published:

  Tags: Accident, Shocking, Social media, Top trending, Viral