Home /News /national /

लेक झाली DSP; इन्स्पेक्टर बाबांनी अभिमानानं केलं कडक सॅल्युट! भावुक क्षणाचा खास PHOTO

लेक झाली DSP; इन्स्पेक्टर बाबांनी अभिमानानं केलं कडक सॅल्युट! भावुक क्षणाचा खास PHOTO

पोलीस निरीक्षक श्याम सुंदर यांनी DSP पदावर असलेल्या मुलीला म्हणजेच जेसी प्रशांती यांना सॅल्यूट केला आहे.

    तिरुपती, 04 जानेवारी : प्रत्येक आई-वडिलांचं स्वप्न असतं आपल्या मुलीनं मोठं व्हावं आणि आपलं नाव कमवावं. त्यांचं हेच स्वप्न आपल्या जिद्द आणि यशाच्या जोरावर पूर्ण करत थेट वडिलांच्या समोर अभिमानानं तरुणी उभी राहिली. तिच्या धाडसाला आणि मेहनतीला वडिलांनी कडक सॅल्युट केला आहे. पोलीस निरीक्षक श्याम सुंदर यांनी DSP पदावर असलेल्या मुलीला म्हणजेच जेसी प्रशांती यांना सॅल्यूट केला आहे. हा भावुक करणारा क्षण कॅमेऱ्यात टिपला असून त्याचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सब इन्स्पेक्टर असलेल्या वडिलांनी आपल्या DSP मुलीला सॅल्युट केलं तेव्हा त्यांचा उर अभिमानानं भरून आला तर छाती गर्वानं फुलली. वडील आणि मुलीच्या या एकाच फ्रेममधील फोटोनं सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आंध्र प्रदेश पोलिसांनी तिरुपती येथे 3 जानेवारी 2021 रोजी पोलिस ड्यूटी मीट 2021 कार्यक्रम आयोजित केला होता. त्याचे उद्घाटन DGP गौतम सवांग यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात मुलीच्या वडिलांनी मुलीला केलेलं सॅल्युट पाहून अधिकारी देखील भावुक झाले आणि त्यांच्या डोळ्यांचा कडा अश्रूंनी भरून आल्या. हे वाचा-मोठी बातमी, बाळासाहेब थोरातांनी दिला प्रदेशाध्यपदाचा राजीनामा? प्रशांती या 2018 बॅचचा पोलिस अधिकारी आहे. सध्या आंध्र प्रदेशातील गुंटूर दक्षिण (शहर) येथे डीएसपी म्हणून कार्यरत आहेत. 2021 मध्ये तिरुपती येथे पोलिस बंदोबस्ताची बैठक आयोजित केली गेली होती. प्रशांतीचे वडील श्याम सुंदर तिरुपती कल्याणी डेम पोलिस प्रशिक्षण केंद्रात पोलीस इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत आहेत. आंध्र प्रदेश पोलिसांच्या पोलीस इन्स्पेक्टर सुंदरचीही याच पोलीस मेळाव्यात आपली ड्युटी करत होते. त्याच वेळी प्रशांती त्यांना दिसली तिला पाहता क्षणी त्यांनी सॅल्युट केलं. हा क्षण पाहून उपस्थित सर्वांनाच खूप भावुक झालं. वडील आणि मुलीचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Police

    पुढील बातम्या