VIDEO : बाप बनला कंस! जमिनीच्या वादात चिमुकल्याला आपटले आणि...

VIDEO : बाप बनला कंस! जमिनीच्या वादात चिमुकल्याला आपटले आणि...

जमिनीच्या वादात राग अनावर झालेल्या बापाने मुलालाच आपटले आणि हवेत फिरवत फेकून मारण्याचा प्रयत्न केला. मात्र आईने मुलाला हिसकावून घेत प्राण वाचवले.

  • Share this:

मथुरा, 05 नोव्हेंबर : कृष्णाची नगरी असलेल्या मथुरेत एक बापच कंस बनल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याने आपल्या लहान चिमुकल्याला जमिनीवर आपटून आणि हवेत फिरवून मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. जमिनीच्या वादातून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या समोर हे घडत असताना पोलिसांसह सर्वजण बघ्यांची गर्दी बनून राहिले होते. मथुरेतील मांट ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. तीन एकर जमीनीवरील अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या सहाय्यक भूलेखाधिकाऱी राजीव उपाध्याय गेले होते. तेव्हा त्यांच्यासमोर रागाच्या भरात बापाने हे कृत्य केलं.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत जमीनीचा ताबा घेण्यासाठी आलेल्या युवकाला पाहून वीरी सिंग यांना राग आला. त्यानंतर वीरी सिंग आणि त्याच्या कुटुंबीयांची त्या युवकासोबत झटापट झाली. त्यावेळी राग अनावर झालेल्या वीरी सिंगने पत्नीच्या कुशीत असलेलं लहान मुल घेतलं आणि त्याला जमिनीवर आपटून मारण्याचा प्रयत्न केला. एवढ्यावरच न थांबता मुलाच्या पायाला पकडून हवेत फिरवून फेकण्याच्या तयारीत असताना पत्नी आडवी गेली. तिने मुलाला हिसकावून घेतल्यानं पुढचा अनर्थ टळला.

बापाने चिमुकल्या मुलाला इतकी मारहाण केली तरी पोलिस मात्र बघत बसले होते. तसेच भूलेखाधिकाऱ्यांनीही याबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार पोलिसांत केलेली नाही. घटनेवेळी बेजबाबदार वागणाऱ्या अधिकाऱ्यांनी त्यानंतर तक्रार न देऊन कळसच केला.

पोलिसांनी आरोपी वीरी सिंगसह तीन लोकांना ताब्यात घेतलं पण त्यांच्यावर फक्त शांतता भंगाची कारवाई केली. सध्या या प्रकरणी जिल्हाधिकारी सर्वज्ञ राम मिश्र यांनी सांगितलं की, या प्रकरणाची सर्व चौकशी एडीएम प्रशासनाकडे सोपवण्यात आली आहे. यामध्ये दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात आली आहे.

<strong>गडकरी-फडणवीस आमच्यासाठी एकच, संजय राऊतांच्या विधानाचा अर्थ काय?</strong>

<iframe id="story-417416" class="video-iframe-bg-color iframe-onload" src="https://lokmat.news18.com/embed/videos/NDE3NDE2/" width="100%" height="150" frameborder="0" scrolling="no"></iframe>

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 5, 2019 02:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading