पाकिस्तानला आणखी एक दणका, FATF ने पुन्हा टाकलं करड्या यादीत

पाकिस्तानला आणखी एक दणका, FATF ने पुन्हा टाकलं करड्या यादीत

आर्थिक संकटात असलेल्या पाकिस्तानला आणखी एक जोरदार धक्का बसला आहे. FATF म्हणजेच फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्सच्या करड्या यादीत पाकिस्तानचं नाव 2020 पर्यंत राहील, अशी चिन्हं आहेत.

  • Share this:

मुंबई, 21 फेब्रुवारी : आर्थिक संकटात असलेल्या पाकिस्तानला आणखी एक जोरदार धक्का बसला आहे. FATF म्हणजेच फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्सच्या करड्या यादीत पाकिस्तानचं नाव 2020 पर्यंत राहील, अशी चिन्हं आहेत.FATF ने पाकिस्तानला दहशतवादाचा निधी रोखण्यासाठीच्या कारवाईसाठी 3 वेळा मुदत वाढवून दिली होती. आता मात्र पुन्हा एकदा ही मुदत वाढवून द्यायला FATF ने नकार दिला आहे. त्यामुळे यावर्षी तरी पाकिस्तान या संस्थेच्या काळ्या यादीत राहणार, अशी चिन्हं आहेत.

सध्या तरी पाकिस्तान या FATF च्या करड्या यादीत आहे. इराण आणि उत्तर कोरियाला तर काळ्या यादीत टाकण्यात आलं आहे.  पाकिस्तानला काळ्या यादीत न टाकता एक संधी देण्यात आली आहे पण तरीही दहशतवाद रोखण्यासाठी पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय समुदायाचा दबाव कायम राहणार आहे.

काय आहे FATF?

FATF च्या निर्बंधांमुळे पाकिस्तान आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून फारसं कर्ज घेऊ शकणार नाही. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाँड मार्केटमध्येही पाकिस्तानची पत कमी होईल.जगभरातले आर्थिक गैरव्यवहार रोखण्यासाठी FATF या आंतरराष्ट्रीय संस्थेची 1989 मध्ये स्थापना झाली. अमेरिकेवरच्या 9/11 च्या हल्ल्यानंतर या यंत्रणेकडे दहशतवादासाठीचा निधी रोखण्याचेही अधिकार देण्यात आले. FATF मध्ये सध्या 39 सदस्य देश आहेत. ही आंतरराष्ट्रीय संस्था आर्थिक गैरव्यवहार रोखण्यासाठी काळ्या यादीतल्या देशांची यादी बनवते आणि कारवाईचा आराखडा तयार करते.

(हेही वाचा : ठाकरे सरकारला मोठा धक्का, राज्यपालांनी फेटाळली महत्त्वाची शिफारस)

आर्थिक गैरव्यवहारांना आळा

पाकिस्तानने अलीकडेच जमात-उद-दावा आणि जैश-ए-मोहम्मदसारख्या संस्थांवर बंदी आणली. पण अशा आणखी संस्थांवर पाकिस्तानने कारवाई केलेली नाही. स्टेट बँक ऑफ पाकिस्तानने त्यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये अवैध आर्थिक व्यवहार आणि दहशतवादास अर्थपुरवठा याविषयी जागरूकता आणणं हेदेखील अपेक्षित होतं. ते न केल्यामुळे पाकिस्तानवर कारवाई झाली.

====================================================================================

First published: February 21, 2020, 2:41 PM IST

ताज्या बातम्या