फतेहाबाद, 07 मार्च : सध्या ऑनलाइन पद्धती आल्यामुळे वीज बिल भरणं तसं सोप झालं आहे. मात्र अद्यापही काही जणांना वीज कार्यालयामध्ये जाऊनच बिल भरणं सोपं जातं. पण विचार करा, जर 11 हजारांचं वीज बिल नाण्यांच्या स्वरूपात घेऊन ग्राहक आला तर पैसे मोजणाऱ्या कर्मचाऱ्याचे काय हाल होतील. असाच एक ग्राहक वीज बिल भरण्यासाठी 11 हजार रुपयांची नाणी घेऊन विद्युत महामंडळाच्या कार्यालयात पोहोचला. पण त्याठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी नाणी घेण्यास नकार दिला आणि बँकेमार्फत बिल भरण्याच्या सूचना दिल्या. मात्र ग्राहक नाणी देऊनच वीज बिल भरण्यास आग्रही असल्याने आता तो प्रकरण न्यायालयात नेणार असल्याचा इशारा त्याने दिला आहे.
(हे वाचा-खूशखबर!...तर भारतात पेट्रोल 4 रुपयांनी स्वस्त होणार, वाचा हे आहे कारण)
हरियाणामध्ये ही घटना घडली आहे. बीघूर रोड येथे राहणाऱ्या कुलदीपची आई कैलास राणी एकटी राहते. कुलदीपच्या म्हणण्यानुसार, त्याची आई आजारी आहे आणि चालू शकत नाही. एक भाऊ आहे जो मानसिक रुग्ण आहे. त्याची आई नियमितपणे वीज बिल जमा करायला येत असे. पण जानेवारीत त्यांचं बिल 46 हजार रुपये आलं. यासंदर्भात ग्राहक मंचामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला. दोन महिन्यांच्या सुनावणीनंतर कोर्टाने फिर्यादीला 11 हजार रुपये देण्याचे आदेश दिले होते.
(हे वाचा- 1 एप्रिलपासून बदलणार PAN, आयकर, GSTचे नियम, तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम)
कोर्टाच्या या आदेशानंतर कुलदीपने घरातून 11 हजार रुपये घेऊन विद्युत महामंडळ कार्यालय गाठलं. मात्र यावेळी त्याने 11 हजार रोख रक्कम नाण्याच्या स्वरुपात आणली. कर्मचाऱ्यांनी नाणी घेण्यास नकार दिल्यामुळे कुलदीप पुन्हा कोर्टाची पायरी ठोठावणार आहे. विद्युत विभागाचे एसडीओ म्हणाले की, ‘आमच्या कर्मचार्यांनी नाणी घेण्यास नकार दिला नाही, त्याऐवजी ते नाणी तपासण्यासाठी आणि जमा करण्यासाठी त्याच्याबरोबर बँकेत गेले. बँकेच्या वीज महामंडळाच्या खात्यात नाणी जमा केल्यानंतर बिल भरले गेले असते, परंतु तक्रारदाराला हे मान्य नव्हते.’