रामलीलेच्या स्टेजवर भाजपच्या नेत्याची 'रासलीला', बारबालांसोबतचा VIDEO व्हायरल

रामलीलेच्या स्टेजवर भाजपच्या नेत्याची 'रासलीला', बारबालांसोबतचा VIDEO व्हायरल

नृत्य करत असताना आपण काय करतो याचं भानही त्यांना राहिलं नाही. प्रेक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणावर महिलांची उपस्थिती होती. त्यामुळे लोकांनीही नाराजी व्यक्त केली.

  • Share this:

फतेहाबाद 06 ऑक्टोंबर : नवरात्र सुरू झाली की दसऱ्यापर्यंत उत्तर भारतात धूम असते ती रामलीलेची. रामलीला (Ramlila)  सादर करण्याची ही गेल्या अनेक वर्षांची परंपरा असून त्याला प्रचंड लोकप्रियताही मिळत असते. हरियाणातल्या (Haryana) फतेहाबाद (Fatehabad)मध्ये रामलीला सादरीकरण होत असताना भाजपच्या नेत्यांच्या प्रतापाची चांगलीच चर्चा रंगलीय. भाजपचा हा नेता मंचावर चढला आणि त्याने बारबालांसोबत डान्स करायला सुरूवात केली. या नेत्याच्या या अश्लील डान्सचा VIDEO चांगलाच व्हायरल होत असून निवडणुकीच्या तोंडावर भाजप अडचणीत येण्याची शक्यता आहे. फतेहाबाद जिल्ह्यातल्या जाखल विभागात श्री राम रेल्वे रामलीला क्लबने रामलीलेचं आयोजन केलं होतं.

वाचा - महाराष्ट्रात 'या' नेत्यासाठी पंतप्रधान मोदींची होणार पहिली सभा

या कार्यक्रमात भाजपच्या नेत्याने हद्दच केली. हा नेते जाखल नगरपालिकेचा उपाध्यक्ष आहे. त्याने रामलीलेच्या पवित्र स्टेजवर अतिश विक्षिप्त हावभाव करत अश्लील नृत्य केलं त्याच्या या नृत्याने सगळ्यांनाच धक्का बसला.

नृत्य करत असताना आपण काय करतो याचं भानही त्यांना राहिलं नाही. प्रेक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणावर महिलांची उपस्थिती होती.

त्यामुळे लोकांनीही नाराजी व्यक्त केली.  हरियाणात सध्या विधानसभेच्या निवडणुकांसाठी प्रचार सुरू आहे. त्यामुळे  विरोधक  या व्हिडीओवरून भाजपला टार्गेट करताहेत. हा नेता भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुभाष बराला यांच्या जवळचा असल्याचं समजलं जातं.

वाचा - भाजपचं टेन्शन वाढलं, बंडखोरी केलेल्या 114 उमेदवारांशी मुख्यमंत्र्यांचा संपर्क

रामलीला सादर करण्याची प्रथा ही गेल्या शेकडो वर्षांपासून सुरू आहे. रामलीला सदर करण्यारे अनेक गट असून त्यांनी कंपन्या स्थापन करून त्याला वेगळं रूप दिलीय. स्थानिक कलाकारांचा या रामलीलेत सहभाग असतो. गावोगावी जाऊन रामायनातले प्रसंग सादर करणं, त्यासाठी मोठं स्टेज उभारून प्रसंग चितारणं असे अनेक प्रयोग या रामलीलेत होत असतात. त्यामुळे भक्तिभावाशीवाय उत्सुकतेपोटीही मोठा जनसमुदाय या रामलीलेला बघायला येत असतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: ramlila
First Published: Oct 6, 2019 05:48 PM IST

ताज्या बातम्या