'नशीब हे बलात्कारासारखे असते; जर रोखू शकत नाही, तर किमान त्याचा आनंद घ्या'

'नशीब हे बलात्कारासारखे असते; जर रोखू शकत नाही, तर किमान त्याचा आनंद घ्या'

नशीबाची तुलना बलात्कारासारख्या घटनेशी केली

  • Share this:

तिरुवनंतपूरम, 22 ऑक्टोबर: 'नशीब हे बलात्कारासारखे असते. तुम्ही त्याला रोखू शकत नाही. तर किमान त्याचा आनंद घ्या', हे वाक्य कोणा गुन्हागार अथवा बलात्कार प्रकरणातील आरोपीचे नाही तर एका लोकप्रतिनिधीच्या पत्नीचे आहे. केरळमधील काँग्रेसचे खासदार (Congress MP) हिबी ईडन (Hibi Eden) यांच्या पत्नीने फेसबुकवर बलात्कारासारख्या घटनेचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. खासदार हिबी ईडन यांची पत्नी अन्ना लिंडा ईडन (Anna Linda Eden) यांनी मंगळवारी फेसबुकवर एक पोस्ट लिहली. या पोस्टमध्ये त्यांनी नशीबाची तुलना बलात्कारासारख्या घटनेशी केली होती.

अन्ना यांनी फेसबुक पोस्टवर लिहले होते की, 'नशीब हे बलात्कारासारखे असते. तुम्ही त्याला रोखू शकत नाही. तर किमान त्याचा आनंद घ्या'. या पोस्टनंतर सोशल मीडियावरून त्यांच्यावर जोरदार टीका सुरू झाली. त्यामुळे त्यांनी संबंधित पोस्ट फेसबुकवरून डिलीट केली. अन्ना यांनी ही पोस्ट शेअर करताना दोन छोटे व्हिडिओ देखील शेअर केले होते. या व्हिडिओत त्यांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्यानंतर मुले घरातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत होते. एका व्हिडिओत घरात पाणी शिरल्याचे दिसत आहे. तर दुसऱ्यामध्ये हिबी ईडन सिज्लर हा पदार्थ खात असल्याचे दिसत आहे.सोमवारी केरळमधील कोच्ची शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. संपूर्ण शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते.

हिबी ईडन यांनी आमदारकीचा राजीनामा देत काँग्रेसच्या तिकिटावर एर्नाकुलम लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणूक लढवली होती. या पहिल्याच निवडणुकीत त्यांनी विक्रमी मतांनी विजय मिळवला होता. एर्नाकुलम हा काँग्रेसचा गड मानला जातो. हिबी ईडन यांच्या पत्नी अन्ना मीडियाशी संबंधित आहेत. त्या सोशल मीडियावर देखील सक्रिय असतात. फेसबुकवर त्यांनी अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत. मंगळवारी त्यांनी जो व्हिडिओ शेअर केला तो वादग्रस्त ठरला.

अन्ना यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओवरून सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झाली. अनेकांनी त्यांच्या पोस्टवर टीका करण्यास सुरुवात केली. सोशल मीडियावर प्रतिक्रिया आल्यानंतर अन्ना यांनी ही पोस्ट डिलीट केली. यासंदर्भात खासदार हिबी किंवा अन्ना यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

First published: October 22, 2019, 1:59 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading