भोपाळ, 6 नोव्हेंबर : नशीबाचा खेळ खूप विचित्र आहे. कधी कोणाचं नशीब फळफळेल काही सांगू शकत नाही. अशावेळी आपण फक्त पाहत राहायचं. मध्य प्रदेशातील पन्ना येथेही असाच प्रकार समोर आला आहे. येथे गेल्या आठवड्यात 4 मजूर लखपती झाले होते. गुरुवारी पुन्हा एकदा एक मजूर लखपती झाला आहे. अनेकांना त्याच्या लखपती होण्याचं कारण सांगितलं तर विश्वास बसणार नाही.
मध्य प्रदेशातील रत्नगर्भा जमिनीमुळे 4 मजुरांचं आयुष्यच बदललं आहे. दिवाळीच्या पूर्वी येथील धरतीतून हिरा सापडला आहे. गेल्या आठवड्यात चार मजुरांना येथे हिरा सापडला आहे. गुरुवारी पुन्हा एकदा मजुराला हिरा मिळाल्याची माहिती समोर आली आहे. या एका हिऱ्याची किंमत लाखोंमध्ये आहे. पन्ना जिल्ह्यातील अजयगड कस्बामधील वॉर्ड क्रमांक 2 चे निवासी संदीप कुमार साहू यांना कृष्णा कल्याणपूर हिऱ्याच्या खाणीत 6 कॅरेट 92 सेंटचा जेम्स गुणवत्ताचे एका हिरा सापडला आहे.
हे ही वाचा-लग्नाच्या 8 वर्षांनंतरही घरात पाळणा हलला नाही; पत्नीने उचललं धक्कादायक पाऊल
याची साधारण किंमत 30 लाख रुपयांहून अधिक असल्याचे सांगितले जात आहे. संदीप साहू रात्रीतून श्रीमंत झाले आहेत. त्यांना मिळालेला हिरा चांगल्या गुणवत्तेचा तर आहेच, मात्र त्याची किंमतही चांगली मिळण्याची शक्यता आहे. हा हिरा पन्नाच्या डायमंड कार्यालयात जमा करण्यात आला आहे. हा हिरा लिलावात ठेवण्यात येईल. याशिवाय सरकारची रॉयल्टी कापून उरलेले पैसे हिरा सापडला त्या व्यक्तीला दिले जातील. ही बातमी मिळताच संदीप साहू यांच्या घरात आनंदाचं वातावरण आहे. मजुराचं काम करणाऱ्या संदीप यांचे दिवस बदलतील अशी त्यांना आशा होती. अखेर हा हिरा सापडल्यामुळे त्यांच्या जीवनात बराच बदल होईल.