सावधान! देशात झपाट्यानं वर सरकतोय 'कोरोना' आलेख, दररोज सरासरी 1100 जणांचा मृत्यू

सावधान! देशात झपाट्यानं वर सरकतोय 'कोरोना' आलेख, दररोज सरासरी 1100 जणांचा मृत्यू

देशात कोरोना आलेख झपाट्यानं वर सरकत आहे. तर अमेरिका (America)आणि ब्राझील (Brazil) सारख्या देशात कोरोनाचा आलेख खाली सरकताना दिसत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 2 ऑक्टोबर: देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या (Coronavirus Cases in India) दिवसागणिक वाढत आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे (Corona) 81 हजार 484 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर कोरोनामुळे 1095 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या 63 लाख 94 हजार 69 झाली आहे. तर कोरोनामुळे मृतांचा 99 हजार 773 वर झाला. धक्कादायक म्हणजे देशात दररोज सरासरी 1100 जणांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे.

देशात कोरोना आलेख झपाट्यानं वर सरकत आहे. तर अमेरिका (America)आणि ब्राझील (Brazil) सारख्या देशात कोरोनाचा आलेख खाली सरकताना दिसत आहे. या देशातमध्ये दररोज सरासरी 800 रुग्णांचा मृत्यू होत आहे.

जगभरात आतापर्यंत 3 कोटी 44 लाख 81 हजार 663 नागरिक कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. तर आतापर्यंत 10 लाख 27 हजार 653 नागरिकांचा कोरोनानं बळी घेतला आहे. अमेरिकेत 2 लाख 12 हजार 660 नागरिकांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत. तर ब्राझिलमध्ये 1 लाख 44 हजार 767 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारतात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ होत आहे. ही वाढ कायम राहिल्यास मृतांचा आकडा येत्या काही दिवसांत एक लाखाच्या वर पोहोचेल, अशी भीती वर्तवली जात आहे.

कोरोनापासून बचाव आणि उपचाराचा मार्ग सापडला

सध्या कोरोना व्हायरसवर विविध आजारांवरील औषधांनी उपचार सुरू आहेत. लशींचं ट्रायल सुरू आहे. अशात भारतीय शास्त्रज्ञांना कोरोनाव्हायरवरील उपचार शोधण्यात एक मोठं यश मिळालं आहे.

इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि हैदराबादच्या बायोलॉजिकल ई. लिमिटेडने (Biological E. Limited, Hyderabad) एक विशेष असं अँटी-सीरम (Antisera) विकसित केलं आहे. सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे भारतीय शास्त्रज्ञांनी बॅक्टेरिया आणि व्हायरसशी लढण्यासाठी आवश्यक असलेल्या अँटिबॉडी तयार केल्या आहेत.

हे अँटी-सीरम कोरोनाव्हायरसवर उपचारासाठी फायद्याचं तर ठरेलच शिवाय कोरोनापासूनही बचाव करण्यासाठीही याचा वापर करता येईल.

याआधीदेखील रेबीज, हेपेटायटिस, वॅक्सिनिया व्हायरस, टिटॅनस, डिप्थिरिया यासारख्या अनेक व्हायरल आणि बॅक्टेरिअल इन्फेक्शनवर अशा पद्धतीने उपचार करण्यात आले आहेत, असं आयसीएमआरने सांगितलं. कोरोनामुक्त रुग्णांच्या प्लाझ्माचा वापरही असाच केला जातो. मात्र या प्लाझ्मामधील अँटिबॉडीजची पातळी प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळी असते. ज्यामुळे त्याचा वापर करताना अडचणी येतात. पण, आता विकसित करण्यात आलेलं हे अँटी-सीरम खूप मोठं यश असल्याचं आयसीएमआरने सांगितलं आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: October 2, 2020, 1:34 PM IST

ताज्या बातम्या