आजपासून फास्टॅग बंधनकारक, अन्यथा भरावा लागेल दुप्पट दंड

आजपासून फास्टॅग बंधनकारक, अन्यथा भरावा लागेल दुप्पट दंड

राष्ट्रीय महामार्गावरुन (National Highway) प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी आज 15 जानेवारी २०२० पासून फास्टॅग बंधनकारक

  • Share this:

नवी दिल्ली, 15 जानेवारी :  राष्ट्रीय महामार्गावरुन (National Highway) प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी आज 15 जानेवारी 2020 पासून फास्टॅग बंधनकारक असणार आहे. मात्र ज्यांच्या गाडीवर फास्टॅगचे स्टिकर दिसणार नाही, त्या वाहनचालकांकडून दुप्पट दंड आकारला जाणार आहे. 'फास्टॅग' हे एक रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन डिव्हाइस आहे. याच फास्टॅगच्या मदतीने आता टोल भरायचा आहे. यामुळे कोणत्याही टोलनाक्यावर कॅशमध्ये टोल वसूल केला जाणार नाही.

'फास्टॅग' कुठे मिळेल ?

तुम्हाला फास्टॅग खरेदी करायचा असेल तर त्याची किंमत 100 रुपये आहे. त्याशिवाय तुमच्या गाडीप्रमाणे वेगळा चार्जही द्यावा लागेल. यासाठी तुम्हाला SBI च्या बँकेत जाऊन पॉइंट ऑफ सेल वर जावं लागेल.

इथे तुम्हाला एक फॉर्म दिला जाईल. हा फॉर्म भरून KYC डॉक्युमेंट्ची फोटोकॉपी द्यावी लागेल. यामध्ये तुमच्या गाडीची RC, एक ID प्रूफ, अ‍ॅड्रेस प्रूफ आणि फोटो द्यावा लागेल. याशिवाय तुम्ही खाजगी बॅंकांमधूनही फास्टॅग खरेदी करू शकता. सिंडिकेट बॅंक, Axis बॅंक, IDFC बॅंक, HDFC बॅंक, ICICI बॅंक या बॅंकांतही फास्टॅग उपलब्ध करण्यात आले आहे.

तुम्हाला जर फास्टॅग रिचार्ज करायचा असेल तर SBI च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन फास्टॅग सेक्शनवर क्लिक करावं लागेल. या सेक्शनमध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुमचा मोबाइल नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा की च्या मदतीने लॉग इन करा. लॉगइन केल्यानंतर तुमच्या गाडीचा पर्याय निवडा आणि रिचार्ज अमाउंट टाका. शेवटी पेमेंटचा पर्याय निवडून फास्टॅग रिचार्ज करा.

टोलनाक्यांवर टोल भरण्यासाठी भलीमोठी रांग असते. त्यातच कॅश देऊन टोल भरण्यातही बराच वेळ जातो. त्यामुळे आता गाडीला फास्टॅग लावण्याची ही सोय करण्यात आली आहे. 15 डिसेंबरपासून फास्टॅग सक्तीचा आहे. त्यामुळे वेळ वाचवायचा असेल आणि टोलचे दुप्पट पैसेही वाचवायचे असतील तर हा गाडीला हा फास्टॅग लावून घ्या.

Published by: Meenal Gangurde
First published: January 15, 2020, 8:04 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading