अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी आयपीसी आणि सीआरपीसीमध्ये बदल करण्याचे आवाहन राज्याचे आयटी मंत्री के.टी. रामाराव यांनी केले. तेलंगनातील हैदराबादमधील डॉक्टर महिला सामूहिक बलात्कार आणि हत्ये प्रकरणी पोलिसांकडून धक्कादायक पुरावे आणि बाबी समोर आल्या आहेत. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला. त्यामुळे एका टायर मेकॅनिकने दिलेल्या छोट्याशा माहितीनंतर 48 तासांमध्ये पोलिसांनी चौघांना अटक केली. पोलिसांनी आरोपींना कसं अटक केलं याची माहिती माध्यमांना दिली आहे. 1. महिला डॉक्टरच्या बहिणीने पोलिसांना सांगितले की तिच्या बहिणीच्या स्कूटीचा टायर पंक्चर झाला होता, त्यामुळे ती टोल प्लाझाजवळ अडकली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी प्रथम टोल प्लाझाजवळ टायर मेकॅनिकचा शोध सुरू केला. पोलिस मेकॅनिकजवळ पोहोचताच त्याने सांगितले की एक लाल रंगाचा स्कूटी त्याच्याकडे आली होती. इतकंच नाही तर ज्याने स्कूटी आणली तो रस्त्याच्या उलट्या बाजूने आला असल्याचेही सांगितले. इतर बातम्या - 'हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशी द्या नाहीतर आत्महत्या करेन' 2. पोलिसांना रस्त्याच्या दुतर्फा एक कारखाना आढळला, जेथे बाहेर सीसीटीव्ही बसविण्यात आले होते. तत्काळ या फुटेजची पाहणी करण्यात आली. हे दोन्ही आरोपी स्कूटीसह पुढे जात असल्याचे दिसून आले. दुसर्या फुटेजमध्ये बराच वेळ एक ट्रक उभा असल्याचे दिसून आले, परंतु अंधारामुळे ट्रकचा नंबर समजू शकला नाही. 3. पोलिसांनी हाती लागलेले सीसीटीव्ही फुटेज 6 ते 7 तास मागे करून पाहिल्यानंतर लक्षात आले की दिवसभर हा ट्रक तेथे उभा होता. ट्रकचा नंबर मिळताच पोलिसांनी त्याच्या मालकाचा शोध सुरू केला. त्याचा मालक श्रीनिवास रेड्डी असून त्याच्याकडे 15 ट्रक आहेत. 4. ट्रक मालकाला सीसीटीव्ही फुटेज दाखवण्यात आले. स्कूटी घेऊन फिरत असलेल्या संशयितास तो ओळखू शकला नाही. पण मालकाने नक्कीच सांगितले की मोहम्मद आरिफ नावाचा चालक ट्रक चालवितो. 5. या दरम्यान, पोलिसांच्या दुसऱ्या पथकाने जवळील पेट्रोल पंपाचे सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करण्यास सुरवात केली. इथे पुन्हा तोच संशयित व्यक्ती स्कूटीला मेकॅनिककडे घेऊन जात होता. हा माणूस इथल्या बाटलीत पेट्रोल किंवा डिझेल खरेदी करत असल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसलं. 6. पोलिस पथकाने मोबाइल टॉवरच्या स्थानावरून आरोपीचा शोध सुरू केला. पोलिसांनी ट्रक चालक आरिफलाही फोन केला, ज्याचा नंबर त्याच्या मालकाने दिला होता. या दोघांच्या माहितीच्या आधारे पोलिसांची टीम आरोपींकडे पोहोचली. 7. दरम्यान, टोल प्लाझापासून सुमारे 30 कि.मी. अंतरावर एका शेतकऱ्याने पोलिसांना कळवले की त्याला एक जळलेला मृतदेह दिसला. हरवलेल्या अहवालाच्या आधारे पोलिसांनी डॉक्टरांच्या कुटुंबियांना घटनास्थळी बोलावले. डार्क स्कार्फ आणि सोन्याच्या पेंडेंटसह डॉक्टर महिलेच्या मृतदेहाची ओळख पटली.Telangana Chief Minister's Office: CM has instructed officials that the accused of the woman veterinary doctor's ghastly murder should be inquired on a fast track, & culprits should be given stringent punishment. CM also decided to set up a fast track court to deal with the case. pic.twitter.com/sYBL02EJrt
— ANI (@ANI) December 1, 2019
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rape case