Home /News /national /

Lockdown: लेकराच्या पार्थिवाचं अत्यंदर्शन घ्यावं लागलं VIDEO CALLवर, वडील म्हणाले

Lockdown: लेकराच्या पार्थिवाचं अत्यंदर्शन घ्यावं लागलं VIDEO CALLवर, वडील म्हणाले

हवालदार पदावर असलेल्या पित्यानं व्हिडीओ कॉलवर आपल्या चिमुकल्या मुलाचं अंत्यदर्शन घेत त्याची माफी मागितली आहे.

    दंतेवाडा, 30 मार्च : देशाच्या सीमांची सुरक्षा आणि सेवा करणाऱ्या पित्याला मात्र आपल्या मुलाच्या अंत्ययात्रेला जात न आल्याची घटना समोर आली आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशभरात 24 मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आल्यानं आपल्या मुलाच्या अंत्ययात्रेला पोहोचू न शकल्याची खंत व्यक्त केली आहे. हवालदार पदावर असलेल्या पित्यानं व्हिडीओ कॉलवर आपल्या चिमुकल्या मुलाचं अंत्यदर्शन घेत त्याची माफी मागितली आहे. या घटनेनं सर्वांचे डोळे पाणावले होते. वडिलांचा जीव असूनही लॉकडाऊनमुळे अंत्ययात्रेला येत आलं नाही याचं दु:ख मोठं होतं. छत्तीसगडमधील घोटपाल गावात राजकुमार नेताम एसएसबी पदावर नेपाळच्या सीमेवर कार्यरत आहेत. त्यांना दोन मुली आहेत. त्याचा 1 वर्षांचा मुलगा खूप आजारी होता. काही महिन्यांपासून त्याच्यावर उपचार सुरू होते. त्याला ट्युमरचा त्रास होता. हे वाचा-'भारताला 21 नाही तर 49 दिवसांचा लॉकडाऊन वाचवू शकतो', तज्ज्ञांचा इशारा बुधवारी अचानक तब्येत खराब झाल्यानं त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि गुरुवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. जेव्हा राजकुमार यांना आपल्या मुलाबद्दल कळलं तेव्हा त्यांनी संपर्क करण्याचा खूप प्रयत्न केला मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला होता. आपल्या मुलाच्या अंत्यसंस्काराला जाण्याची त्यांची इच्छा मात्र लॉकडाऊनमुळे अपूर्ण राहिली. त्यांनी व्हिडीओ कॉलकरून आपल्या मुलाच्या पार्थिवाचं अत्यंदर्शन घेतलं अश्रू अनावर झाले होते पण लॉकडाऊनमुऴे प्रयत्न करूनही घरापर्यंत पोहोचणं शक्य नव्हतं. राजकुमार यांनी आपल्या मुलाच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेताना त्याची माफी मागितली. मला व्हिडीओ कॉलमध्येही रेंजचा खूप प्रॉब्लेम येत होता त्यामुळे फक्त मी त्याच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेऊ शकलो. देशाचं संरक्षण करणं माझं पहिलं कर्तव्य आहे. मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती दिली होती. मात्र लॉकडाऊनमुळे अंत्ययात्रेला जाणं शक्य झालं नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. हे वाचा-21 दिवसांनंतर वाढवणार लॉकडाऊन? मोदी सरकारने दिलं उत्तर
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या