मराठी बातम्या /बातम्या /देश /

UP Hostage Crisis : मोदी सरकारच्या ‘त्या’ योजना मिळाल्या नाहीत म्हणून माथेफिरूने 11 तास 23 मुलांना डांबलं, धक्कादायक पत्र VIRAL

UP Hostage Crisis : मोदी सरकारच्या ‘त्या’ योजना मिळाल्या नाहीत म्हणून माथेफिरूने 11 तास 23 मुलांना डांबलं, धक्कादायक पत्र VIRAL

उत्तर प्रदेशातील मोहम्मदाबाद येथील कोतवाली इथे माथेफिरुने डांबून ठेवलेल्या 23 मुलांची 8 तासांनंतर अखेर सुखरूप सुटका करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशातील मोहम्मदाबाद येथील कोतवाली इथे माथेफिरुने डांबून ठेवलेल्या 23 मुलांची 8 तासांनंतर अखेर सुखरूप सुटका करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशातील मोहम्मदाबाद येथील कोतवाली इथे माथेफिरुने डांबून ठेवलेल्या 23 मुलांची 8 तासांनंतर अखेर सुखरूप सुटका करण्यात आली आहे.

  • Published by:  Priyanka Gawde

फारूखाबाद, 31 जानेवारी : उत्तर प्रदेशातील मोहम्मदाबाद येथील कोतवाली इथे माथेफिरुने 11 तास 23 मुलांना डांबून ठेवले होते. मात्र पोलिसांनी या मुलांची सुखरुप सुटका केली आहे. दरम्यान, 23 मुलांना ओलीस ठेवलेल्या या माथेफिरुने पोलीस चकमकीच्या काही काळआधी आपल्या मागण्या चठ्ठीच्या स्वरूपात ठेवल्या होत्या. या माथेफिरुने आपल्या चिठ्ठीट पंतप्रधान आवास योजनेचे घर आणि शौचालय मिळाल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

उत्तर प्रदेश पोलिसांनी तब्बल 11तासांच्या ऑपरेशननंतर या मुलांची सुखरुप सुटका केली. पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत माथेफिरू जागीच ठार झाला. तर जमावाने केलेल्या मारहाणीत त्याची पत्नी जखमी झाली होती. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. दरम्यान डांबून ठेवलेल्या या मुलांमध्ये 6 महिन्यांच्या मुलीचा समावेश असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चकमकीआधी माथेफिरूनं स्वत: 6 महिन्यांच्या मुलीला पोलिसांच्या हवाली केलं होतं. मात्र बाकी मुलांना त्याने डांबून ठेवलं. जोपर्यंत त्याची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत मुलांची सुखरुप सुटका करण्यास तो तयार नव्हता. या मागण्यांमध्ये त्याने घर, वीज आणि शौचालय न मिळाल्याबदद्लही नाराजी व्यक्त केली होती. मात्र पोलिसांनी केलेल्या ऑपरेशननंतर या मुलांची सुखरुप सुटका करण्यात आली.

वाचा-ओलीस ठेवलेल्या 23 मुलांची सुखरूप सुटका, चकमकीत माथेफिरू ठार

Farrukhabad Police: More than 15 children, and a few women, have been held hostage at a house by a man. Incident of firing has also taken place. Operation to rescue them is underway. Senior police officers are present at the spot. https://t.co/SFoEdEuq7g pic.twitter.com/PkPALZ4Z4Y

— ANI UP (@ANINewsUP) January 30, 2020

राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संपूर्ण पोलिस पथकाला दहा लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. डीजीपी ओ. पी. सिंह म्हणाले की, सर्व 23 मुले सुरक्षित आहेत. त्यांची वैद्यकीय चाचणीही केली जात आहे, असे सांगितले.

वाचा-शिक्षक-विद्यार्थी नात्याला काळीमा, दिव्यांग मुलाचा शिक्षिकेने छळ केल्याचा आरोप

काय होतं पत्रात

दरम्यान, या माथेफिरुचे एक पत्र व्हायरल होत आहे. यात त्यांनी आपल्या काही मागण्या लिहून घेतल्या. आपल्याला घर मिळालेले नाही, असेही त्यांनी पत्रात या घराचा आणि शौचालयाचाही उल्लेख आहे. पत्रात असे लिहिले आहे की कॉलनी (घर) त्यांच्यासाठी आली होती, परंतु प्रधानने ती देण्यास नकार दिला. पत्रात त्याने लिहिले आहे की त्याची आई हालचाल करू शकत नाही त्यासाठी शौचालयाची मागणी केली होती, मात्र त्याला ते मिळाले नाही. पुढे त्याने असेही लिहिले आहे, अधिकाऱ्यांना आणि गाव प्रधानाची भेट घेऊनही त्याचे काम झालेले नाही.

वाचा-SEXमुळे चॅम्पियन खेळाडू डोपिंग टेस्टमध्ये झाली फेल, असे बदलले रिपोर्ट

नेमकं काय घडलं होतं?

करतिया गावात सुभाष वथम यांनी वाढदिवसाच्या बहाण्याने परिसरातील मुलांना बोलावून ओलीस ठेवलं होतं. त्याची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत मुलांना सोडणार नसल्याचं त्याने सांगितलं. दरम्यान घटनेची माहिती पोलिसांना मिळताच उत्तर प्रदेश पोलीस आणि दिल्लीहून एनएसजीची टीम फर्रुखाबादला पोहोचली होती. 8 तासांच्या चकमकीनंतर अखेर पोलिसांनी या मुलांची सुखरूप सुटका केली आहे. माथेफिरुनं केलेल्या गोळीबारात दोन पोलीस जखमी झाले आहेत. गोळीबारात माथेफिरू ठार झाल्याची माहिती उत्तर प्रदेश पोलिसांनी दिली आहे.

First published: