श्रीनगर, 16 मे : नुकत्याच झालेल्या काश्मिरी पंडित कर्मचाऱ्याच्या हत्येमुळे राज्यात पुन्हा एकदा काश्मिरी पंडितांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला (farooq abdullah) यांनी काश्मिरी पंडितांवरील हल्ल्यांचा संबंध काश्मीर फाइल्स (Kashmir Files) या चित्रपटाशी जोडला आहे. फारुख अब्दुल्ला म्हणाले की, काश्मिरी पंडितांवर होणारे हल्ले थांबवायचे असतील तर सरकारने काश्मीर फाइल्स या चित्रपटावर बंदी घालावी.
फारुख अब्दुल्ला म्हणाले की, देशात मुस्लिमांविरोधात द्वेषाचे वातावरण आहे, हेच काश्मीरमधील मुस्लिम तरुणांमध्ये संतापाचे कारण आहे.
संभाषणात काश्मीर फाइल्स (Kashmir Files) या चित्रपटाचा संदर्भ देत फारुख अब्दुल्ला म्हणाले की, मी सरकारला विचारले की काश्मीर फाइल्स चित्रपट खरा आहे का? मुसलमान आधी हिंदूला मारेल, मग त्याचे रक्त तांदळात टाकेल आणि बायकोला सांगेल की तू हे खा. हे होऊ शकते का? आपण इतके खालच्या पातळीवर घसरलो आहोत का?
फारुख अब्दुल्ला पुढे म्हणाले की, काश्मीर फाईल्स हा निराधार चित्रपट आहे ज्याने देशात केवळ द्वेष निर्माण केला आहे. काश्मीरमध्ये काही दिवसांपासून काश्मिरी पंडितांवरील हल्ले अचानक वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर नायब राज्यपालांच्या आदेशानुसार खोऱ्यातील काश्मिरी पंडितांच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
बुद्ध पौर्णिमेच्या पूर्व संध्येला दलित नवरदेवाची वरात रोखली, दगडफेकीमुळे गाव हादरलं!
लष्कर-ए-इस्लामची धमकी
या हल्ल्यांदरम्यान रविवारी लष्कर-ए-इस्लामनेही धमकी दिली होती. काश्मिरी पंडितांनी खोरे सोडावे नाहीतर मरायला तयार व्हावे, असे म्हटले होते.
पोस्टरमध्ये लिहिले आहे, 'सर्व स्थलांतरित आणि आरएसएसचे एजंट निघून जा नाहीतर मृत्यूला सामोरे जाण्यासाठी तयार राहा. ज्यांना काश्मीरला दुसरा इस्रायल करायचं आहे आणि काश्मिरी मुस्लिमांना मारायचे आहे, अशा काश्मिरी पंडितांना इथे जागा नाही. तुमचा बचाव दुप्पट किंवा तिप्पट करा, टार्गेट किलिंगसाठी तयार रहा. तुम्ही मरणार'.
शेतकरी आंदोलनातलं मोठं नाव अचानक बाजूला कसं पडलं? राकेश टिकैत भावासह आपल्याच संघटनेत एकाकी
पुलवामा येथील हवाल ट्रान्झिट निवासस्थानात राहणाऱ्या काश्मिरी पंडितांना ही धमकी देण्यात आली आहे. या ट्रान्झिट निवासस्थानात राहणारे बहुतेक काश्मिरी पंडित सरकारी नोकरी करतात. हे पोस्टर हवाल ट्रान्झिट हाऊसिंगच्या अध्यक्षांना उद्देशून लिहिले आहे.
निशाण्यावर काश्मिरी पंडित
काश्मीरमधून कलम 370 हटवल्यापासून काश्मिरी पंडितांच्या परतीचे दावे केले जात आहेत. मात्र, गेल्या तीन वर्षातील वास्तव हे आहे की तेथे पूर्वीपासून राहणाऱ्या काश्मिरी पंडितांनाही राहू दिले जात नाही. त्यांची हत्या केली जात आहे. राहुल भट्ट यांची गेल्या आठवड्यात झालेली टार्गेट किलिंग याचा पुरावा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.