देशभरातल्या शेतकऱ्यांचं आज दिल्लीत आंदोलन

देशभरातल्या शेतकऱ्यांचं आज दिल्लीत आंदोलन

सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या 50 टक्के अधिक नफा देऊ, असं आश्वासन भाजपने दिलं होतं. मात्र त्याची अद्यापही पूर्तता न झाल्याने हे आंदोलन पुकारण्यात आलंय

  • Share this:

20 नोव्हेंबर: गेले काही महिने देशभर शेतकऱ्यांचे संप चालू आहेत. सर्वत्र शेतकऱ्यांच्या मनात सरकारच्याबद्दल असंतोष दिसतो आहे. याच पार्श्वभूमीवर आज देशभरातील शेतकऱ्यांचं नवी दिल्लीत आंदोलन आहे. सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना हमीभावाचं आश्वासन देणाऱ्या मोदी सरकारविरोधात राजधानीत संपूर्ण देशातल्या शेतकरी एकवटला आहे.

सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या 50 टक्के अधिक नफा देऊ, असं आश्वासन भाजपने दिलं होतं. मात्र त्याची अद्यापही पूर्तता न झाल्याने हे आंदोलन पुकारण्यात आलंय. गेल्या महिन्यात मध्य प्रदेशातल्या अखिल भारतीय किसान समितीनं हमीभावासाठी मंदसौरमधून मोठी पदयात्रा काढली होती. त्याच पार्श्वभूमीवर हे आंदोलन काढण्यात येतंय. या आंदोलनात देशभरातील शेतकरी सहभागी होणार आहेत.

तर दुसरीकडे राज्य सरकारने १० जुलैला जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचा सरकारी घोळ अजून संपला नसल्यामुळे ही योजना रेंगाळली आहे. कर्जमाफीसाठी २२ सप्टेंबरपर्यंत ५६ लाख ५९ हजार १७८ शेतकऱ्यांनी संपूर्ण माहितीसह ऑनलाइन अर्ज सरकारकडे सादर केले. त्यानंतर, लेखापरीक्षकांनी बँकांमध्ये जाऊन या अर्जांची पडताळणी केली. लेखापरीक्षकांनी काढलेल्या त्रुटी दूर करून, अद्ययावत याद्या अपलोड करण्यात आल्या, पण त्यानंतर रोज सॉफ्टवेअरमध्ये बदल आणि नवीन माहितीमुळे याद्या अपलोडच्या कामास विलंब लागत असून, आजही हे काम पूर्ण झालेले नाही. कर्जमाफीची योजना जाहीर होऊन चार महिने झाले, तरी अद्याप याद्यांचा घोळ संपलेला नाही.त्यामुळे कर्जमाफीही पूर्णत: झालेली नाही.

त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर तरी सरकार शेतकरी प्रश्नावर तोडगा काढतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

First published: November 20, 2017, 9:12 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading