Home /News /national /

VIDEO: कृषी बिलविरोधात बळीराजा आक्रमक तर पोलिसांची दडपशाही, आंदोलकांवर अश्रूधुराचा वापर

VIDEO: कृषी बिलविरोधात बळीराजा आक्रमक तर पोलिसांची दडपशाही, आंदोलकांवर अश्रूधुराचा वापर

पंजाबमधील हजारो शेतकरी कृषी कायद्याविरूद्ध हरियाणा हद्दीत दाखल झाले आहेत. हरियाणा सरकारने पंजाब सीमा सील केली आहे.

    नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : कृषी बिलविरोधात देशभरात आंदोलन करण्यात येत आहे. Farms Law 2020 या कायद्याविरोधात शेतकरी एकवटला असून आजपासून 28 नोव्हेंबरपर्यंत हा मोर्चा सुरू राहणार आहे. चलो दिल्ली म्हणत शेतकरी पायी दिल्लीच्या दिशेनं रवाना झाले आहेत. पंजाब आणि हरियाणा येथील हजारो शेतकरी दिल्लीला रवाना झाले आहेत. दरम्यान, केंद्र सरकारने हे स्पष्ट केले आहे की कोणत्याही परिस्थितीत कृषी कायदा मागे घेतला जाणार नाही किंवा तो बदलला जाणार नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा कायदा शेतकऱ्यांच्या हिताचा असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दुसरीकडे या कायद्याविरोधात शेतकऱ्यांकडून जोरदार प्रदर्शन होत असल्याचं दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी पोलिसांची अधिक कुमक देखील तैनात करण्यात आली आहे. शंभू सीमेजवळ पोलिसांनी शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. हा जमाव दिल्लीपर्यंत पोहोचू नये यासाठी पोलिसांकडून पाण्याचे फवारे आणि अश्रूधुराचा वापर केला जात असल्याचे समोर आले आहे. हे वाचा-पोलिसाकडे केली 5 लाखांच्या खंडणीची मागणी, नकार दिल्यानंतर भररस्त्यात घातली गोळी हरियाणा इथे अंबालाजवळ बळीराजाच्या मार्चवर पोलिसांनी पाण्याचे फवारे करून शेतकऱ्यांचं आंदोलन रोखण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र शेतकरी पोलिसांना न जुमानता दिल्ली चलो या आंदोलनावर ठाम असल्याचं पाहाला मिळत आहे. कुठे पोलिसांनी अश्रूधुराचा तर कुठे पाण्याचा वापर करून हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्याचं पाहायला मिळत आहे. हे वाचा-आमिर खानला हायकोर्टाचा दिलासा,अभिनेत्याविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळली पंजाबमधील हजारो शेतकरी कृषी कायद्याविरूद्ध हरियाणा हद्दीत दाखल झाले आहेत. हरियाणा सरकारने पंजाब सीमा सील केली आहे. गुरुवारी येथील सीमेवर 1 लाखाहून अधिक शेतकरी जमतील असा शेतकरी संघटनेचा दावा आहे. बुधवारी चंदीगड-दिल्ली महामार्गावर 15 किलोमीटरपर्यंच जाम झाला होता. अंबाला महामार्गावर जमलेल्या शेतकऱ्यांना दिल्लीपर्यंत पोहोचू न देण्यासाठी पोलिसांकडून हे आंदोलन दडपण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. तर संतप्त शेतकऱ्यांनी पोलिसांनी लावलेले बॅरिकेट्स तोडले आणि आक्रमक पवित्रा घेतल्यानं अनेक भागांमध्ये कलम 144 लागू करण्यात आलं आहे. 100 हून अधिक शेतकरी नेत्यांना ताब्यात घेतलं आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Delhi, Delhi latest news, Farmer

    पुढील बातम्या