शेतकरी आंदोलनाचं (Farmers Protest) समर्थन करणासाठी पोहोचलेल्या माजी क्रिकेटपटू युवराज सिंग (Yuvraj Singh) याचे वडिल योगराज सिंग (Yograj Singh) याने हिंदूंबाबत कथित रुपाने वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
नवी दिल्ली, 5 डिसेंबर : शेतकरी आंदोलनाचं (Farmers Protest) समर्थन करणासाठी पोहोचलेल्या माजी क्रिकेटपटू युवराज सिंग (Yuvraj Singh) याचे वडिल योगराज सिंग (Yograj Singh) याने हिंदूंबाबत कथित रुपाने वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. शेतकरी आंदोलनात हिंदूंबाबत केलेल्या वक्तव्यानंतर योगराज सिंग यांच्या अटकेची मागणी केली जात आहे. योगराज सिंग यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. News18 योगराज सिंग यांच्या या व्हिडिओच्या सत्यतेची पुष्टी करत नाही.
योगराज सिंग यांचा जो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, त्यामध्ये ते पंजाबी भाषेत भाषण करत आहेत. भाषणादरम्यान योगराज सिंग यांनी हिंदूंना गद्दार म्हणल्याचं या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलं आहे. 'हे हिंदू गद्दार आहेत, 100 वर्ष त्यांनी मुगलांची गुलामी केली,' असं योगराज सिंग भाषणादरम्यान म्हणाल्याचं या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलं आहे. एवढच नाही तर त्यांनी महिलांबाबतही वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
Shameful! #yograjsingh father of cricketer Yuvraj Singh abusing Hindus during farmer's protests.
सोशल मीडियावर अनेकांनी योगराज सिंग यांच्या या वक्तव्याची निंदा केली आहे. योगराज सिंग यांचं वक्तव्य भडकाऊ, अपमानकारक आणि घृणास्पद असल्याचं अनेकांनी म्हणलं आहे. याआधीही योगराज सिंग त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत होते. भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या बाबतीतही त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. युवराजला भारतीय टीममधून बाहेर काढण्यात आलं, त्यानंतर त्याला टीममध्ये जागा मिळत नव्हती, म्हणून योगराज सिंग यांनी धोनीला जबाबदार धरलं होतं.