मराठी बातम्या /बातम्या /देश /

Farmer Protest: MSP चा शेतकऱ्यांना कसा फायदा होणार?

Farmer Protest: MSP चा शेतकऱ्यांना कसा फायदा होणार?

शेतकरी आंदोलनात (Farmer Protest) किमान आधारभूत किंमत (MSP- Minimum Support Price) हा सर्वात मोठा मुद्दा आहे. त्यामुळे एसएसपी हा प्रकार काय आहे? याचा शेतकऱ्यांना काय फायदा होतो हे समजून घेणे आवश्यक आहे.

शेतकरी आंदोलनात (Farmer Protest) किमान आधारभूत किंमत (MSP- Minimum Support Price) हा सर्वात मोठा मुद्दा आहे. त्यामुळे एसएसपी हा प्रकार काय आहे? याचा शेतकऱ्यांना काय फायदा होतो हे समजून घेणे आवश्यक आहे.

शेतकरी आंदोलनात (Farmer Protest) किमान आधारभूत किंमत (MSP- Minimum Support Price) हा सर्वात मोठा मुद्दा आहे. त्यामुळे एसएसपी हा प्रकार काय आहे? याचा शेतकऱ्यांना काय फायदा होतो हे समजून घेणे आवश्यक आहे.

  • Published by:  News18 Desk
नवी दिल्ली, 7 डिसेंबर: शेतकरी आंदोलनात (Farmer Protest) किमान आधारभूत किंमत (MSP- Minimum Support Price) हा सर्वात मोठा मुद्दा आहे. या किंमतीमध्ये कोणताही बदल केला नसल्याचा सरकारचा दावा आहे. तर या कायद्याच्या मार्फत एमसपीला संपुष्टात आणण्याचा कट रचल्याचा आरोप शेतकरी संघटनांचा आहे. या व्यवस्थेचा फायदा फक्त 6 टक्के शेतकऱ्यांनाच होतो असा काही तज्ज्ञांचा दावा आहे.  सर्व बड्या शेतकऱ्यांनाच या व्यवस्थेचा फायदा होत असून त्यामुळे सामान्य शेतकऱ्यांचं भलं कसं होणार? असा प्रश्न ही तज्ज्ञ मंडळी विचारतात. तर, राष्ट्रीय किसान महासंघाने एमएसपीला शेतकऱ्यांचा कायदेशीर हक्क करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे एसएसपी हा प्रकार काय आहे? याचा शेतकऱ्यांना काय फायदा होतो हे समजून घेणे आवश्यक आहे. आधारभूत किंमत का? केंद्र सरकारचे कृषी आणि मुल्य आयोग (CACP-Commission for Agricultural Costs and Prices) च्या शिफारसीनंतर पेरणीच्या पूर्वी काही पिकांसाठी किमान मुल्य निश्चित केले जाते. या पिकांच्या किंमती बाजारांमध्ये पडल्या तरी सरकारकडून शेतकऱ्यांना निर्धारित रक्कम दिली जाते. शेतकऱ्यांचे नुकसान कमी करण्याचा प्रयत्न सरकारकडून या व्यवस्थेच्या मार्फत केला जातो. किमान आधारभूत किंमतीसाठी तांदूळ, गहू, ज्वारी, यासह 26 प्रमुख पिकांचा दर निश्चित केला जातो. देशातल्या सर्वच शेतकऱ्यांना याचा फायदा होत नाही. मध्य प्रदेश आणि बिहारच्या शेतकऱ्यांना एमएसपी लागू नाही. तसेच फक्त सहा टक्के शेतकऱ्यांनाच याचा फायदा होतो. उर्वरित 94 टक्के शेतकरी मार्केटवर अवलंबून आहेत, असे मत या विषयावर नेमण्यात आलेल्या शांताकुमार समितीने व्यक्त केले होते. हे वाचा-Amazon ला मोठा दणका, कंपनीतील गैरव्यवहाराविरोधात व्यापारी संघटनांची EDकडे तक्रार एमसपी निश्चित करण्याचे निकष काय ? केंद्र सरकारचे कृषी आणि मुल्य आयोग (CACP-Commission for Agricultural Costs and Prices) एमएसपीची शिफारस करताना पुढील गोष्टींचा विचार करते
  1. उत्पादनाची किंमत काय आहे?
  2. उत्पादनाची पेरणी करण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या किंमतीमध्ये किती बदल झाला?
  3. बाजारातील वर्तमान किंमतींचा ड्रेंड
  4. मागणी आणि पुरवठ्याची परिस्थिती
  5. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिस्थिती काय आहे?
किंमत निश्चित करण्याचे सूत्र काय? A 2 – शेतकऱ्यांनी केलेला सर्व प्रकारच्या खर्चाचा यामध्ये समावेश होतो. शेतीचे उत्पादन घेताना येणारा सर्व प्रकारचा खर्च, उदा: बियाणे, किटकनाशके, शेतमजूर, पेट्रोल, सिंचन या सर्व प्रकारच्या खर्च यामध्ये येतात.  A2 + FL – या गटात A2 मधील सर्व खर्चाचा समावेश आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या घरातील व्यक्तींनी शेतीमध्ये घेतलेल्या मेहनतीचा मोबदला देखील यामध्ये जोडला जातो. C2 (Comprehensive Cost): शेतकऱ्यांसाठी हे सर्वात फायदेशीर सूत्र मानले जाते. यामध्ये ज्या जमिनीमध्ये पिकांचे उत्पादन घेण्यात आले आहे, त्याची किंमत देखील जोडण्यात येते. त्याचबरोबर जमिनीचे भाडे, शेती करण्यासाठी लावण्यात आलेली स्थिर संपत्ती याचाही यामध्ये समावेश होतो. तसेच एकूण कृषी संपत्तीवर लावण्यात येणाऱ्या व्याजाचा देखील या गटात समावेश होतो. सरकारचा दावा काय आहे? डबलिंग फार्मर्स इंकम कमिटी (DFI) चे सदस्य विजय पाल तोमर यांनी न्यूज 18 हिंदीशी बोलताना सरकार C2+50 या सुत्राच्या आधारे शेतकऱ्यांना एमएसपी देत आहे. मोदी सरकारने 2018 साली स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू केल्या आहेत, असे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय किसान आयोगाचे प्रथम अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री सोमपाल शास्त्री यांनी मात्र स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची मूळ स्वरुपात अंमलबजावणी झाली नसल्याचा आरोप केला आहे. तसेच सरकार C2+50 च्या सूत्रानुसार एमएसपी देत नसल्याचा दावा  शास्त्री यांनी केला आहे.
First published:

Tags: Farmer

पुढील बातम्या