Home /News /national /

एक दोन नव्हे, चार पंतप्रधान होते शेतकरी कुटुंबातले! कृषी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हे नक्की वाचा

एक दोन नव्हे, चार पंतप्रधान होते शेतकरी कुटुंबातले! कृषी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हे नक्की वाचा

शेती प्रश्नांची माहिती नसल्याने चुकीचे निर्णय घेण्यात येत असल्याचा आरोप कृषी कायदा (Farm bill) आणि त्याच्या विरोधातलं शेतकरी आंदोलन (Farmers protest) याच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत आहे. पण गरिबीतून वर आलेल्या या 4 पंतप्रधानांबद्दल माहीत आहे का?

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 2 डिसेंबर : नवीन शेतकरी कायद्याविरोधात (New agriculture bill) मागील काही दिवसांपासून शेतकरी आंदोलन (Farmers protest) करत आहेत. भारतीय राजकारणात उच्च स्थानावर शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांची काहीही माहिती नसलेले नेते बसले असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे शेती प्रश्नांची माहिती नसल्याने असे चुकीचे निर्णय (Farm Bill) घेण्यात येत असल्याचा देखील आरोप करण्यात येत आहे. स्वातंत्र्यानंतर देशाला आतापर्यंत चार शेतकरी कुटुंबातील पंतप्रधान लाभले आहेत. यामधील तीन जणांचा थेट गावाशी संबंध होता आणि खूप गरिबीतून कष्ट आणि जिद्दीच्या बळावर वर आलेले होते. 1947 मध्ये भारताला स्वातंत्र मिळाले. त्यानंतर आतापर्यंत 73 वर्ष झाले असून या कलावाधीत भारताला 14 पंतप्रधान लाभले आहेत. परंतु यामधील जास्त पंतप्रधान हे स्वातंत्रलढ्याशी संबंधित किंवा उत्तम कौटुंबिक पार्श्वभूमी असलेले होते. यामधील मोरारजी देसाई(morarji desai) आणि अटल बिहारी वाजपेयी (atal bihari vajpeyi) यांचे वडील शिक्षक होते. लाल बहादुर शास्त्री (lal bahadur shastri) आणि मनमोहन सिंग(manmohan singh) यांचे वडील सरकारी नोकरीमध्ये होते. शास्त्री यांचे वडील मुन्सफ होते, तर मनमोहन यांचे वडील क्लार्क होते. यामध्ये चार पंतप्रधान हे शेतकरी कुटुंबातील होते. यामध्ये चौधरी चरण सिंह, चंद्रशेखर आणि एच. डी. देवेगौडा साधारण किंवा गरीब शेतकरी कुटुंबातील होते तर पी. वी. नरसिंह राव आंध्र प्रदेशमधील संपन्न शेतकरी कुटुंबातील होते. शेतकरी कुटुंबातील चरण सिंह दिवंगत माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह(chaudhari charan singh)  यांना आजदेखील शेतकरी आपला नेता मानतात. राजकीय नेते म्हणून त्यांनी शेतकऱ्यांसाठी जितके कार्य केले तितके कार्य कुणीही केले नसल्याचे देखील म्हटले जाते. 1979 मध्ये त्यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. देशाचे पाचवे पंतप्रधान म्हणून त्यांनी शपथ घेतली होती. बहुमत सिद्ध न करता आल्यानंतर देखील ते 7 महिने पंतप्रधानपदावर होते. ते पश्चिम उत्तर प्रदेशमधील पूर्णपणे शेतीवर उपजीविका आधारित असलेल्या प्रदेशातील होते. त्यांनी वकिलीचे शिक्षण घेतले होते परंतु शेतकरी, गाव आणि कुटीर उदयोगांचा विचार करणारा पंतप्रधान म्हणून त्यांना ओळखले जात असे. आजदेखील शेतकरी त्यांना मानतात नेता    शेतकऱ्यांसाठी त्यांनी खूप मोठे कार्य केले आहे. त्यांची पुस्तके आजदेखील सर्वांसाठी मोठी उदाहरणे आहेत. शेतकऱ्यांचे अधिकार त्यांना मिळवून देण्यासाठी त्यांनी खूप संघर्ष केला. उत्तर भारतातील शेतकरी आजदेखील त्यांना आपला नेता मानत असून त्यांच्याइतके कार्य शेतकऱ्यांसाठी कुणीही केले नसल्याचे ते म्हणतात. शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी मोठे कष्ट देशाच्या समृद्धीचा रस्ता हा गावातील शेतीतून जात असल्याचे ते नेहमी म्हणत. उत्तर प्रदेशात जमीनदारी निर्मूलन विधेयकाची रूपरेषा तयार करुन गरीबांना हक्क मिळवून देणारे ते नेते होते. शेतकऱ्यांना खूश केल्याशिवाय विकास होऊ शकत नाही हे त्यांनी नेहमीच सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. शेतकर्‍यांच्या भरभराटीसाठी शेतीवर भर देण्यात आला. शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव(MSP) मिळावा यासाठी देखील ते खूप गंभीर होते. चंद्रशेखर अनवाणी पायांनी शेतात जात दिवंगत पंतप्रधान चंद्रशेखर (chandrashekhar rao) 1990 मध्ये देशाचे नववे पंतप्रधान झाले होते. त्यांचा जन्म बलियाच्या गरीब शेतकरी कुटुंबात झाला. त्यांना शेती आणि शेतीबद्दल सर्व काही माहीत होते, आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचा गाव आणि शेतीशी संबंध होता. संसदेत शेतकरी आणि शेतीशी संबंधित लोकांसाठी सतत आवाज उठविला. गावात सामान्य माणूस जेवतो, तेवढेच ते खायचे. पंतप्रधान असताना ते अशा खोलीत राहत असत, ज्याची आज कल्पनाही केली जाऊ शकत नाही. अनेकदा ते अनवाणी पायानेच शेतीमध्ये जात असतं. देवेगौडा कर्नाटक मधील शेतकरी कुटुंबातील    देशाचे बारावे पंतप्रधान हरदहळ्ळी दोड्डेगौडा देवेगौडा(H.D. Devegauda) कर्नाटकातील मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातील आहेत. यामुळेच संसदेत नेहमी ते शेती  आणि शेतकर्‍यांच्या बाजूने उभे राहिले. त्यांनी सरकारकडे शेती व शेतकर्‍यांसाठी कायमस्वरूपी एक आयोग तयार करण्याची मागणी करत आले आहेत. सरकार संसदेत शेती सुधारणेशी संबंधित तीन विधेयके मंजूर करीत असताना त्यांनी घाईघाईने ते मंजूर करण्यावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. शेतकर्‍यांसाठी विशेष पॅकेजची देखील अनेकदा त्यांनी मागणी केली आहे. पी. वी. नरसिंह राव बालपण गेलं खेड्यात    देशात आर्थिक सुधारणा घडवून आणणारे दिवंगत पंतप्रधान नरसिंह राव(narsinh rao) यांचा जन्म गावात झाला होता. शेतकरी कुटुंबाशी त्यांचा संबंध होता. त्यांच्या कुटुंबाचा मोठ्या शेतकरी कुटुंबात समावेश होतो. राव यांची ग्रामीण अर्थव्यवस्था, शेती यावर मजबूत पकड होती.  भारतीय राजकारणात ते कृषी तज्ज्ञ नेते म्हणूनही परिचित होते. ग्रामीण भारत समृद्ध झाला तरच  देशाचा विकास होईल असे ते नेहमी म्हणायचे. विकास कार्यक्रम चांगल्या पद्धतीने राबविले जातील, असा त्यांचा विश्वास होता. राव यांनी आपली बरीच जमीन गरीबांना दान केली होती.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Agriculture, Protesting farmers

    पुढील बातम्या