Home /News /national /

शेतकरी आंदोलनाचा तिढा कायम, सरकारने दिला पुन्हा चर्चेचा प्रस्ताव

शेतकरी आंदोलनाचा तिढा कायम, सरकारने दिला पुन्हा चर्चेचा प्रस्ताव

सरकारची नियत आणि नीती स्वच्छ आणि प्रमाणिक असून सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी बांधिल असल्याचंही त्यांनी स्पष्ट कले. केंद्रीय कृषी सचिव विवेक अग्रवाल यांनी आंदोलन करणाऱ्या 40 संघटनांना पत्र पाठवून सरकारची भूमिका स्पष्ट कळवली आहे.

    नवी दिल्ली 22 डिसेंबर: गेल्या महिनाभरापासून दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. मात्र अजुनही तोडगा निघालेला नाही. सरकारने केलेले चर्चेचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर (Narendra Singh Tomar)  यांनी शेतकऱ्यांना पुन्हा एकदा चर्चेचा प्रस्ताव दिला आहे. शेतकऱ्यांनीच चर्चेची तारिख आणि वेळ ठरवावी त्यावेळी सरकार चर्चेसाठी तयार असल्याचंही तोमर यांनी म्हटलं आहे. सरकारची नियत आणि नीती स्वच्छ आणि प्रमाणिक असून सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी बांधिल असल्याचंही त्यांनी स्पष्ट कले. नव्या कायद्यांचा MSPशी काहीही संबंध नाही. MSP जाहीर करणं हा प्रशासनिक निर्णय असतो. मी आणि पंतप्रधानांनी संसदेतही याबाबतीत स्पष्ट आश्वासन दिलं असून सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. केंद्रीय कृषी सचिव विवेक अग्रवाल यांनी आंदोलन करणाऱ्या 40 संघटनांना पत्र पाठवून सरकारची भूमिका स्पष्ट कळवली आहे. सरकार शतेकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी बांधिल असून शेतकऱ्यांनी पूर्वग्रह न ठेवता चर्चा करावी असं त्यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. आंबोली-दोडामार्गाच्या जंगलात आढळले दुर्मिळ 'वनमानव', PHOTO आला समोर दरम्यान, शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून शेतकरी आंदोलनावरून पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. 'दिल्लीतील रकीबगंज गुरुद्वारात पंतप्रधान मोदी अचानक गेले. गुरू तेगबहादूर यांच्या समाधीपुढे त्यांनी माथे टेकवले. यात अस्वस्थ होण्यासारखे काय आहे? मोदी यांनी कोणतीही कृती केली तरी ते नाटक किंवा ढोंगच आहे, असे मानून विरोधक टीका करतात. हे काही योग्य नाही. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना अनेकदा मंदिर, मशीद, गुरुद्वारात गेल्याच आहेत. ईदचा शिरकुर्मा आणि बिर्याणी तर अनेकांनी चापली आहे, पण मोदी यांच्याबाबतीत विरोधक वेगळी भूमिका घेतात याचे आश्चर्य वाटते' असं म्हणत शिवसेनेनं मोदींना टोला लगावला आहे.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Farmer

    पुढील बातम्या