पुणतांब्यांतून बळीराजाच्या लेकी पेटवणार अन्नत्याग आंदोलनाची 'मशाल'!

पुणतांब्यांतून बळीराजाच्या लेकी पेटवणार अन्नत्याग आंदोलनाची 'मशाल'!

आपल्या विविध मागण्यांसाठी बळीराजाच्या लेकींनी आंदोलनाची मशाल पेटवली आहे. आपल्या मागण्या घेऊन पुणतांबातील या लेकी अन्नत्याग आंदोलन करणार आहेत.

  • Share this:

शिर्डी,३ फेब्रुवारी : पुणतांबा. जगचा पोशिंदा असलेल्या बळीराजानं शेतकरी संपाची हाक दिली आणि पुणतांबा हे गाव राज्याच्या, देशाच्या नव्हे तर जगाच्या नकाशावर आलं. याच पुणतांबा गावातून शेतकरी संपाची मशाल पेटली! बळीराजा आपल्या मागण्या घेऊन रस्त्यावर उतरला आणि त्याची ताकद साऱ्या जगानं पाहिली. त्याच पुणतांब गावातील बळीराजाच्या लेकींनी अन्नत्याग आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणतांबा गावातून ‘देता की जाता?’ असा इशारा देत किसान क्रांती संघटनेच्या वतीनं राज्यभर यात्रा सुरू आहे. त्याचवेळी पुणतांबा गावातील बळीराजाच्या लेकी आता आक्रमक झाल्या आहेत. आपल्या हक्कासाठी त्या सोमवारपासून अन्नत्याग आंदोलनाची मशाल पेटवणार आहेत. दीड वर्षापूर्वी याच पुणतांबा गावातून शेतकरी संपाची हाक दिली गेली होती.

त्यानंतर सारा देश हादरून गेला होता. आता, त्याच गावातील लेकी अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. शिवाय, किसान क्रांती संघटनेच्या वतीनं राज्यस्तरीय यात्रा देखील काढली जात आहे. सातबारा कोरा करा, शेत मालाला दीड पट हमीभाव द्या, दुधाला प्रतिलिटर ५० रुपये भाव द्या अशा प्रमुख मागण्या बळीराजाच्या लेकींनी केल्या आहेत.

किसान क्रांती संघटनेचे राज्य समन्वयक धनंजय जाधव यांची कन्या निकिता जाधव या आंदोलनाचं नेतृत्व करणार आहे. 'सरकार जर, आमच्या मागण्या पूर्ण करत नसेल तर, आमची शेती सरकारने करावी आणि आम्हाला चतुर्थ श्रेणी कामगाराचा पगार द्यावा' अशी मागणी देखील बळीराजांच्या लेकींनी केली आहे.

अण्णांचंही शेतकऱ्यांसाठी उपोषण

अण्णा हजारेंनी देखील लोकपालच्या मागणीसह शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उपोषण सुरू केलं आहे. अण्णा हजारेंच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. दरम्यान, अण्णा हजारेंची प्रकृती खालावली आहे. लोकायुक्त कायद्याची अंमलबजालणी, शेतमालाला हमीभाव, स्वामीनाथन आयोगाची अंमबजावणी याशिवाय वेगवेगळ्या मागण्यांसाठी अण्णा हजारे राळेगणसिद्धीमध्ये उपोषणाला बसले आहेत.

जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत, उपोषण कायम ठेवणार असल्याचा निर्धार अण्णांनी व्यक्त केला आहे. गिरीश महाजन यांनी अण्णांची भेट घेतल्यानंतर अण्णांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली.

दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील सरकारला पत्र लिहून अण्णा हजारेंच्या जीवाशी खेळू नका असा म्हटलं आहे.

तर, मनसे अध्यक्ष उद्या अर्थात सोमवारी राळेगणसिद्धी येथे अण्णा हजारेंची भेट घेणार आहेत. दरम्यान, ८ तारखेपर्यंत सरकारनं मागण्यांवर ठोस निर्णय न घेतल्यास पद्मभूषण परत करण्याचा इशारा अण्णा हजारे यांनी दिला आहे.

VIDEO: ...जेव्हा मोदींच्याच स्टाईलमध्ये बोलत राहुल गांधी म्हणतात, 'चौकीदार चोर है'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 3, 2019 06:33 PM IST

ताज्या बातम्या