मराठी बातम्या /बातम्या /देश /आंदोलक शेतकऱ्यांच्या अंगावर भाजप कार्यकर्त्यांनी घातली कार, संतप्त शेतकऱ्यांनी पेटवल्या गाड्या

आंदोलक शेतकऱ्यांच्या अंगावर भाजप कार्यकर्त्यांनी घातली कार, संतप्त शेतकऱ्यांनी पेटवल्या गाड्या

 शेतकरी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या (Farmers burned vehicles of BJP workers after conflict with them) संघर्षानंतर जोरदार हाणामारी आणि जाळपोळ झाल्याची घटना समोर आली आहे.

शेतकरी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या (Farmers burned vehicles of BJP workers after conflict with them) संघर्षानंतर जोरदार हाणामारी आणि जाळपोळ झाल्याची घटना समोर आली आहे.

शेतकरी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या (Farmers burned vehicles of BJP workers after conflict with them) संघर्षानंतर जोरदार हाणामारी आणि जाळपोळ झाल्याची घटना समोर आली आहे.

लखनऊ, 3 ऑक्टोबर : शेतकरी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या (Farmers burned vehicles of BJP workers after conflict with them) संघर्षानंतर जोरदार हाणामारी आणि जाळपोळ झाल्याची घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरीमध्ये (Farmers were to show black flag to deputy CM Keshav Prasad Maurya) उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांना काळे झेंडे दाखवण्याच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांच्या अंगावर भाजप कार्यकर्त्यांनी गाडी घातली. त्यामुळे संघर्ष पेटला आणि (Fight between Farmers and BJP workers) शेतकरी आक्रमक झाले.

असा पेटला संघर्ष

केंद्रीय कृषी कायद्यांना विरोध करणारे शेतकरी सध्या देशाच्या विविध भागात आंदोलन करत आहेत. दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी उत्तर प्रदेशच्या प्रत्येक जिल्ह्यात महापंचायतीचं आयोजन केलं आहे. रविवारी लखीमपूर खिरी भागात उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य पोहोचणार होते. त्यांना काळे झेंडे दाखवण्यासाठी शेतकऱ्यांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. मात्र मौर्य तिथे येण्यापूर्वीच भाजपचे काही कार्यकर्ते तिथं पोहोचले.

शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी

भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी चढवली. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आणि त्यांनी भाजप कार्यकर्त्यांवर हल्लाबोल केला. भाजप कार्यकर्त्यांच्या गाड्या शेतकऱ्यांनी पेटवून दिल्या. आक्रमक शेतकऱ्यांनी 2 गाड्यांना आग लावल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला.

हे वाचा -हुश्श! खुर्ची वाचली, ममता बॅनर्जीं 58 हजार मतांनी विजयी

पोलीसफाटा तैनात

उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य कार्यक्रमाला येणार असल्यामुळे या जागी अगोदरच पोलीस बंदोबस्त होता. मात्र परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाईल, अशी कुणालाच अपेक्षा नव्हती. उपमुख्यमंत्र्यांना सुरक्षित अंतर राखून काळे झेंडे दाखवण्याचा कार्यक्रम शेतकऱ्यांनी आयोजित केला होता. मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांनी थेट शेतकऱ्यांच्या अंगावरच गाडी घालत त्यांना आव्हान दिल्यामुळे परिस्थिती चिघळल्याचं स्थानिकांनी सांगितलं आहे. या ठिकाणचा पोलीस बंदोबस्त आता वाढवण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी माध्यमांना दिली आहे.

First published:
top videos

    Tags: BJP, Farmer protest, Uttar pardesh