Farmers protest : रोटी मेकर आणि फुट मसाजर्सनंतर शेतकऱ्यांसाठी आता आणखी एका गोष्टीची भर

सगळ्या प्रतिकुलतांवर मात करत शेतकरी दिल्लीच्या विविध बॉर्डर्सवर ठाण मांडून बसला आहे. समस्यांवर मात करायला तो आगळेवेगळे जुगाडही शोधतो आहे.

सगळ्या प्रतिकुलतांवर मात करत शेतकरी दिल्लीच्या विविध बॉर्डर्सवर ठाण मांडून बसला आहे. समस्यांवर मात करायला तो आगळेवेगळे जुगाडही शोधतो आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली, 20 डिसेंबर : शेतकरी आंदोलनाची (Farmers protest) धग देशभरातच नव्हे तर अगदी विदेशातही पोचली आहे. आपल्या मागण्यांवर ठाम असणारे शेतकरी चारदोन महिन्यांचं धान्य घेऊनच दिल्ली बॉर्डरवरील (Delhi Border) आंदोलनस्ठळी पाय रोवून उभे ठाकलेत. शेतकऱ्यांचा निर्धार आणि एकवाक्यता कौतुकाचं कारण ठरत आहे. मात्र अजून काही गोष्टीही यात आहेत, जसे की, स्वयंचलित रोटी मशिन्स, हाय-टेक सोलर पॅनल्स आणि वॉशिंग मशिन्स. यात आता अजून एक भर पडलीय. ती म्हणजे वॉटर गिझर्सची. हे वॉटर गिझर्स 'मेड इन पंजाब' आहेत. अतिशय कल्पकतेनं बनवलेले हे वॉटर गिझर्स लाकडाच्या जळणावर चालतात. या गिझर्सच्या एका बाजूला एक नरसाळ्यासारखं छिद्र असतं, ज्यातून लाकूड टाकता येतं. एका बाजूनं थंड पाणी टाकल्यावर दुसऱ्या बाजूनं गरम पाणी बाहेर काढण्यासाठीचा मार्ग केलेला आहे. "हा तर पंजाबी जुगाड आहे. आम्ही याला देसी गिजर म्हणतो. पंजाबमधल्या प्रत्येक घरात हे असतं. आता इथंही आणलं आम्ही याला. लंगरमध्ये वापरण्यासाठीही हे आम्हाला दिलं गेलं. सगळ्यांना वापरण्यासाठी हे विनामूल्य उपलब्ध आहे." 52 वर्षांचे मनजिंदर सिंग आंदोलकांसाठी खीर बनवताना सांगतात. सध्या आंदोलक हाडं गोठवणाऱ्या थंडीत संघर्ष करत आहेत. अशावेळी हे गिजर्स त्यांना कमालीचे उपयेगी पडत आहेत. आंघोळाचं पाणी गरम करण्यासह अन्न शिजवण्यासही यांचा उपयोग होतो आहे. एक गिझर बनवण्यासाठी 3000-3500 इतका खर्च येतो. सध्या तापमानात घट झाल्याचं दिसत असल्याने आंदोलनस्थली गिझर्सची संख्या अजूनच वाढली आहे. "इथं रोज ट्रकभरून कचरा जमा होतो. गिझर्समुळे काही कचरा तरी जळणासाठी उपयोगात आणता येतो. ही आमच्यासाठी मोठीच गोष्ट आहे." एका स्वयंसेवकानं सांगितलं. लुधियानाचे गुरप्रितसिंग यांना हे गिझर्स इथं उपयोगात येत असल्याचा आनंद वाटतोय तर गाजियाबादच्या अजय नागरला हे गिझर्स पहिल्यांदाच पाहताना आश्चर्य वाटत आहे.
    Published by:News18 Desk
    First published: