शामली, 16 डिसेंबर : उत्तर प्रदेशच्या शामली येथील मंडईमध्ये एक रुपये किलो फ्लॉवरच्या विक्रीमुळे दोन शेतकरी इतके निराश झाले की त्यांनी ट्रॅक्टर चालवून त्यांचे 15 बिघा कोबीचं पीक नष्ट केले. त्याचबरोबर त्यांनी नवीन कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करत 20 दिवस सुरू असलेल्या शेतकरी चळवळीचं दिल्लीत समर्थन केलं आहे. ते म्हणाले की, केंद्र सरकारचे तिन्ही कृषी कायदे हे शेतकऱ्यांसाठी हानिकारक आहेत.
शामलीमधील कैराना भागात दोन शेतकऱ्यांनी बुधवारी आपल्या 15 बिघा जमिनीवर फ्लॉवरच्या शेतीवर ट्रॅक्टर चालवला. मायापूर येथील निवासी शेतकरी रमेश यांनी सांगितलं की, त्यांनी मेहनतीने शेतात तब्बल 5 बिघा जमिनीवर फ्लॉवरची शेती केली होती. गेल्या काही दिवसात फ्लॉवर दिल्लीतील बाजारात विक्रीसाठी नेले होते. परंतु बरेच दिवसांनंतरही त्यांच्याजवळी फ्लॉवर तेथे विक्री करु शकली नाही. या दिवसात फ्लॉवर देखील खराब झाली होती. त्याचबरोबर इतर बाजारांमध्ये फ्लॉवर फक्त एक रुपये प्रति किलो दराने विकत घेण्यात आली. तर फ्लॉवरचं पीक घेण्यासाठी 4 ते 5 हजार रुपये प्रती बिगा खर्च आला होता. रागाच्या भरात रमेशने शेतातील उरलेले फ्लॉवरच्या पिकावर ट्रॅक्टर चालवला.
तसेच, झाडखेडीतील रहिवासी शेतकरी तन्वीर यांनीही ट्रॅक्टर चालवून आपला 10 बिघा कॉलीफ्लॉवर पिकांचा नाश केला. शेतकरी तन्वीरने सांगितले की, बाजारात फ्लॉवरची विक्री केल्यानंतर जितका खर्च याचं उत्पादन घेण्यासाठी केला तितकाही खर्च मिळत नाही. त्यामुळे पिक शेतातच नष्ट केलं जात आहे.
बाजारात फ्लॉवरचा भाव 15 रुपये प्रति किलो
शहरातील बाजारांचा भाव पाहिला तर फ्लॉवर 10 ते 15 रुपये प्रति किलोपर्यंत विकला जात आहे. याशिवाय दिल्ली, नोएडासह अन्य मोठ्या शहरांमध्ये 35 ते 40 रुपये प्रति किलो आणि कोबी 20 ते 25 रुपये किलोपर्यंत ग्राहकांना विकला जात आहे.