Farmers Protest : शेतकऱ्यांचं आजपासून चक्काजाम आंदोलन, टोल नाके-महामार्ग रोखून धरण्याचा इशारा

Farmers Protest : शेतकऱ्यांचं आजपासून चक्काजाम आंदोलन, टोल नाके-महामार्ग रोखून धरण्याचा इशारा

नवा कृषी कायदा रद्द करण्याची या शेतकऱ्यांची मागणी आहे. हा कायदा रद्द होत नाही तोपर्यंत शेतकरी आंदोलन सुरू राहणार असल्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 12 डिसेंबर : राजधानी दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं नव्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा आजचा 17वा दिवस आहे. आतापर्यंत अनेक बैठकांच्या फेऱ्या झाल्या मात्र शेतकरी अद्यापही आपल्या मागणीवर ठाम असून आता आक्रमक भूमिका घेतली आहे. दिल्लीला जोडणारे महामार्ग अडवून चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष बलबीर. एस. राजेवाल (Balbir S Rajewal) यांनी शेतकऱ्यांच्या वतीनं हा इशारा केंद्र सरकारला दिला आहे. आमच्या मागण्या मान्य करा अन्यथा दिल्ली-मध्य प्रदेश-राजस्थान-गुजरातच्या दिशेनं जाणारे महामार्ग रोखून धरू असा इशारा देण्यात आला आहे. या शेतकरी आंदोलनावरून देशात एकीकडे राजकारण सुरू आहे. राजकीय पातळीवर आरोप-प्रत्यारोप सुरू असताना शेतकऱ्यांनी हे आंदोलन आणखीन आक्रमक करण्याचा इशारा दिला आहे. 14 डिसेंबरला पुन्हा एकदा भारत बंद करण्याचं आवाहन देखील दिलं आहे.

हे वाचा-मुंबई IIT मधील प्रवेशासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेणाऱ्या विद्यार्थ्याला यश

उपजिल्हाधिकारी कार्यालये, भाजप नेत्यांच्या घरासमोर निदर्शनं या व्यतिरिक्त टोल नाक्यावर गाड्या अडवण्यात येतील मात्र रेल्वे, लोकल अथवा लांब पल्ल्याच्या गाड्या अडवण्याबाबत कोणताही हेतू नसल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे. नवा कृषी कायदा रद्द करण्याची या शेतकऱ्यांची मागणी आहे. हा कायदा रद्द होत नाही तोपर्यंत शेतकरी आंदोलन सुरू राहणार असल्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. या आंदोलनात 30 हजारहून अधिक शेतकरी आणि 1500 हून अधिक ट्रॅक्टर आणि गाड्या सहभागी झाल्या आहेत.

Published by: Kranti Kanetkar
First published: December 12, 2020, 9:34 AM IST

ताज्या बातम्या