Farmer Protest : मोर्चे, आंदोलने आणि गच्च भरलेल्या सभा; देशात असा साजरा झाला महिला शेतकरी दिवस!

Farmer Protest : मोर्चे, आंदोलने आणि गच्च भरलेल्या सभा; देशात असा साजरा झाला महिला शेतकरी दिवस!

केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर मागील 50 दिवसांपासून शेतकरी आंदोलन (Farmers protest) सुरु आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 19 जानेवारी : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर मागील 50 दिवसांपासून शेतकरी आंदोलन (Farmers protest) सुरु आहे. या शेतकरी आंदोलनात पंजाब, हरियाणासह देशभरातून हजारो शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. केंद्रानं मंजूर केलेले तिन्ही कृषी कायदे (Farmers Bills) रद्द करावे अशी या आंदोलक शेतकऱ्यांची मागणी आहे.

या आंदोलनात तरुण, वृद्ध, महिला, मुली आणि लहान मुलंही सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. या आंदोलनात पुरुष आंदोलकांच्या खांद्याला खांदा लावून महिला आंदोलक देखील काम करत आहेत. यामुळे आज आंदोलन संपूर्णपणे महिला सांभाळणार असून आजचा दिवस महिला शेतकरी दिवस ( Women Farmers' Day) म्हणून नोंद केला जाणार आहे. आजच्या दिवशी या आंदोलनाची कमान महिलांच्या हाती असणार असून संपूर्ण जबाबदारी महिला आंदोलक पार पाडणार आहेत. या स्टेजवर पूर्णपणे महिलांचा ताबा असणार असून केवळ महिला प्रवक्त्या बोलणार आहेत. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय कमिटीच्या(AIKSCC) कविता कुरुगंती यांनी याविषयी माहिती देताना म्हटले, देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी महिला शेतकर्‍यांनी हा दिवस साजरा करण्यासाठी मोर्चे, आंदोलने आणि सभा आयोजित केल्या आहेत. महिला शेतकरी दिवस साजरा करण्यासाठी महिला आंदोलकांनी घेतलेल्या या पुढाकाराला दिल्लीतील अनेक महिला संघटनांनी देखील पाठिंबा दिला आहे. मी या कामात मदत  करून खूपच खुश आहे. वडीलधारी व्यक्तींना मदत करून मला खूपच आनंद होत असल्याचे या दिवसाविषयी बोलताना सिंघू बॉर्डरवरील महिला आंदोलकाने आपले मत व्यक्त केले.

हे ही वाचा-लॉकडाउनमुळे किती बेरोजगारांना मिळाल्या नोकऱ्या?ठाकरे सरकारने आकडेवारी केली जाहीर

भारतीय अर्थव्यवस्थेचे आधीच कंबरडे मोडले आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींनी आभाळ गाठले आहे. वाढता कर्जबाजारीपणा, ढासळलेली सार्वजनिक वितरण प्रणाली याचबरोबर मनरेगातील रोजगारात झालेली घट, या जीवनावर देखील परिणाम झाला आहे. वाढत्या बेरोजगारीचा फटका महिलांना देखील बसला आहे. त्यामुळे या तीन शेतकरी विधेयकांमुळे शेतकऱ्यांच्या समस्येत आणखी वाढ होणार असल्याचे महिला शेतकऱ्यांना समजले असल्याचे अखिल भारतीय लोकशाही महिला संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. किसान एकता मोर्चाने आपल्या ट्विटरवरून महिलांच्या या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी  #WomenFarmersAgainstFarmLaws या हॅशटॅगचा वापर करण्याचं आवाहन केलं आहे.

दरम्यान, शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) कायदा 2020,शेतकरी (सशक्तीकरण आणि संरक्षण) किंमत आश्वासन आणि कृषी सेवा करार कायदा 2020 आणि अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) कायदा 2020 हे तिन्ही कायदे रद्द करण्यासाठी मागील 50 दिवसांहून अधिक दिवस शेतकरी आंदोलन करत आहेत.पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील हजारो शेतकरी सिंघू बॉर्डरवर बसले आहेत. शेतकऱ्यांना चांगली किंमत मिळावी आणि त्यांच्या मालाला लवकरात लवकर गिऱ्हाईक मिळावं यासाठी केंद्र सरकार हे कायदे तयार करत असल्याचे म्हणत आहे. मूलभूत आधारभूत किंमत (MSP) बाजार समित्यांचं अस्तित्व आणि कंत्राटी शेती(Contract Farming) हे मुद्दे प्रामुख्याने शेतकऱ्यांनी घेतलेल्या आक्षेपांच्या आंदोलनाच्या केंद्रस्थानी आहेत. त्यामुळे शेतकरी हे तिन्ही कायदे पूर्णपणे मागे घेण्याची मागणी करत आहेत. आंदोलक आणि सरकारमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या असून अजूनही त्यावर तोडगा न निघाल्याने संपूर्ण देशाचे लक्ष याकडे आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: January 19, 2021, 6:38 PM IST

ताज्या बातम्या