
पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असूनही आज शेतकरी कृषी कायदे (Farm act) रद्द करण्याच्या मागणीसाठी ट्रॅक्टर रॅली (Kisan Tractor Rally) घेऊन अखेर लाल किल्ल्यावर ( Red Fort in Delhi ) धडकले.

लाल किल्ल्यावर पोहोचल्यानंतर शेतकऱ्यांनी जोरदार जल्लोष केला व संतप्त झालेल्या जमावाने लाल किल्ल्यात घुसत जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला.

लाल किल्ल्यावर चढाई करून शेतकरी आंदोलकांनी किल्ल्याच्या घुमटावर झेंडा फडकावला.

काही ठिकाणी शेतकरी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याचं पाहायला मिळालं.

बॅरिकेड्स तोडून आंदोलक लाल किल्ल्यावर घुसले. तत्पूर्वी रॅलीत दगडफेक आणि त्या पाठोपाठ पोलिसांचा लाठीमार झाल्यामुळे आंदोलक आक्रमक झाले होते.

पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार धुमश्चक्री उडाली होती. पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज केला तर काही ठिकाणी आंदोलकांनी पोलिसांवर हल्ला केल्याचे समोर आले आहे.

काही काळानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. सर्व स्तरावरून पोलिसांवर हल्ला आणि दगडफेकीच्या घटनेचा निषेध केला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.