मुंबई, 03 फेब्रुवारी : आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहानानं (Rihanna) भारतामध्ये सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या बाजूनं ट्वीट केलं आहे. रिहानानं आंदोलनाच्या ठिकाणी इंटरनेट बंद करण्याच्या मुद्यावर टीका केली आहे. रिहानानं हे ट्वीट करताच भारतामध्ये या विषयावर दोन गटातमध्ये वाद सुरु झाला आहे. काही जणांनी रिहानाच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. तर काहींनी या प्रकरणात तिच्यावर टीका केली आहे. टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू प्रज्ञान ओझानं (Pragyan Ojha) या विषयावर ट्विट करत रिहानाला चोख उत्तर दिलं आहे.
शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणारी रिहाना ही पहिली आंतरराष्ट्रीय सेलिब्रेटी आहे. रिहानानं ‘सीएनएन’ मधील एक लेख ट्विट करत ‘आपण या विषयावर का बोलत नाही? #FarmerProtest असं ट्विट केलं आहे. रिहानाचे ट्विटरवर 10 कोटी फॉलोअर्स आहेत. रिहानाचं हे ट्वीट अगदी थोड्या वेळात व्हायरल झालं. अनेकांनी त्याला रिट्वीट केलं आहे. बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर हिनं रिहानाच्या ट्विटची प्रशंसा केली तर कंगना रणौतनं तिच्यावर टीका केली आहे.
(हे वाचा-420 विकेट्स घेणारा बॉलर निवृत्त, धोनीच्या कॅप्टन्सीमध्ये केलं होतं पदार्पण)
कंगना रणौत पाठोपाठ टीम इंडियाचा माजी स्पिनर प्रज्ञान ओझाही मैदानात उतरला आहे. त्यानं रिहानाला ट्विटरवरच उत्तर दिलं आहे. 'मला खात्री आहे की, या प्रकरणावर लवकरच तोडगा निघेल. आमच्या अंतर्गत प्रकरणात बाहेरच्या व्यक्तीनं हस्तक्षेप करण्याची गरज नाही. माझ्या देशाला शेतकऱ्यांचा नेहमीच अभिमान आहे. त्यांचं किती महत्त्व आहे, याची देखील देशाला जाणीव आहे,' असं उत्तर ओझा यानं दिलं आहे.
My country is proud of our farmers and knows how important they are, I trust it will be addressed soon. We don’t need an outsider poking her nose in our internal matters!
— Pragyan Ojha (@pragyanojha) February 2, 2021
(हे वाचा-शेतकरी आंदोलनावर ट्वीटणाऱ्या सेलेब्रिटींना परराष्ट्र मंत्रालयाचं खरमरीत उत्तर)
प्रज्ञान ओझानं फेब्रुवारी 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानं मुंबईमध्ये 2013 साली वेस्ट इंडिज विरुद्ध शेवटची टेस्ट खेळली होती. या मॅचमध्ये त्याला ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Farmer protest, Social media, Tweet