शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, कमलनाथ यांचा पहिल्याच दिवशी मोठा निर्णय

शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, कमलनाथ यांचा पहिल्याच दिवशी मोठा निर्णय

शेतकऱ्यांची कोणत्याही नियम आणि अटींशिवाय सरसकट कर्जमाफी करण्यात आली आहे.

  • Share this:

भोपाळ, 17 डिसेंबर : मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्याच दिवशी शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री कमलनाथ यांनी याबाबत घोषणा केली आहे. शेतकऱ्यांची कोणत्याही नियम आणि अटींशिवाय सरसकट कर्जमाफी करण्यात आली आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी निवडणूक प्रचारात मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. निवडणूक विजयानंतर राहुल यांनी कर्जमाफीवर केलेल्या विधानावरून विरोधकांकडून त्यांना टार्गेट करण्यात आलं. पण अखेर काँग्रेसने कर्जमाफी करून विरोधकांना उत्तर दिलं आहे.

निवडणूक जिंकल्यावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी म्हणाले होते की, कर्जमाफी हे शेतीवरील शेवटचं उत्तर नाही. शेती प्रश्नावरील उत्तर खूप अवघड आहे. आम्ही ते शोधण्याचा प्रयत्न करू. आम्ही कर्जमाफीदेखील देऊ.'

कर्जमाफीशिवायच स्थानिक पातळीवर चालणारा प्रचंड भ्रष्टाचार, शेतकऱ्यांचे विविध प्रश्न, ग्राम पंचायत पातळीवर गोशाळा उभारणी हे प्रश्न मार्गी लावणं, हे आपल्या सरकारचे पहिले प्राधान्य असेल, असं कमलनाथ म्हणाले आहेत.

VIDEO: 'मी सिंधिया नाही शिंदेच, माझं रक्त मराठी'

First published: December 17, 2018, 5:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading