मराठी बातम्या /बातम्या /देश /

200 रुपयांत चमकलं शेतकऱ्याचं नशीब! हाती लागला 60 लाखांचा हिरा

200 रुपयांत चमकलं शेतकऱ्याचं नशीब! हाती लागला 60 लाखांचा हिरा

मध्यप्रदेशातील एका शेतकऱ्याला खोदकाम करताना चक्क 14.98 कॅरेटचा हिरा सापडला आहे. विशेष म्हणजे गेल्याच महिन्यात त्यानं ही जमीन २०० रुपयांत भाडेतत्वावर घेतली होती.

  • Published by:  News18 Desk

पन्ना, 07 डिसेंबर : कोणाचं नशीब कधी फळफळेल आणि  हाती कुबेराचा खजाना लागून कधी मालामाल होईल, हे काही सांगता येत नाही. असाच कुबेराचा खजाना मध्यप्रदेशातील एका शेतकऱ्याच्या हाती लागला आहे. त्याला खोदकाम करताना चक्क 14.98 कॅरेटचा हिरा सापडला आहे. विशेष म्हणजे गेल्याच महिन्यात त्याने अवघ्या २०० रुपयांत ही जमीन भाडेतत्वावर घेतली होती. या शेतकऱ्याचं नाव लखन यादव असून तो मध्यप्रदेशातील पन्ना येथील रहिवाशी आहे.

मध्य प्रदेशातील पन्ना हे ठिकाण हिऱ्यांच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे. इथल्या खाणींमध्ये विविध प्रकारचे बहुमोल हिरे सापडतात. गेल्याच महिन्यात लखन यादवने येथील जमीन भाडेतत्वावर घेतली होती आणि अवघ्या एका महिन्यातच त्याचं नशीब फळफळलं आहे. कारण हातावर पोट भरणाऱ्या या शेतकऱ्याच्या पोराच्या हाती चक्क कुबेराचा खजाना लागला आहे. त्याला येथे 14.98 कॅरेटचा हिरा सापडला आहे. त्यामुळे तो एका रात्रीत लखपती झाला आहे.

हे वाचा-मोलमजुरी करणाऱ्याच्या मुलाचा IIT पासून अमेरिकेपर्यंत डंका

खोदकाम करताना सापडलेला हिरा त्याने आता जिल्हा प्रशासनाकडे जमा केला आहे. या बदल्यात जिल्हा प्रशासनाने त्याला एक लाख रुपये दिले आहेत. या पैशातून त्याने मोटारसायकल खरेदी केली आहे. उरलेल्या पैशात त्याला त्याच्या मुलांचं शिक्षण पूर्ण करायचं आहे. या ठिकाणी आणखी हिरे सापडू शकतात अशी आशा त्याला आहे. म्हणून तिथे आणखी खोदकाम करण्याचं त्यानं ठरवलं आहे. लखन यादवला पन्नाच्या खाणीत सापडलेल्या हिऱ्याचा शनिवारी लिलाव झाला. यामध्ये तो बहुमोल हिरा 60.6 लाख रुपयांना विकला गेला.

“त्या हिऱ्याने माझं आयुष्य बदलून टाकलं आहे. हिरा नजेरला पडला तो, क्षण मी कधीच विसरु शकत नाही. खोदकाम करताना दगडांमध्ये विलक्षण चमकणारी एक वेगळी वस्तू दिसली” असेही लखन यादवनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितलं.

लखपती झाल्यानंतर आता कसे वाटते? या प्रश्नावर लखन यादव म्हणाले की, “काही तरी मोठं मिळेल म्हणून मी गेलो नव्हतो. माझे शिक्षण झालेलं नाही. माझ्या चार मुलांना चांगले शिक्षण मिळालं पाहिजे. हीच माझी अपेक्षा आहे. त्यासाठी मी हे पैसे बँकेत फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवणार आहे.”

First published:

Tags: Farmer, Madhya pradesh