भोपाल, 18 ऑक्टोबर : मध्यप्रदेशातील खंडवामध्ये (Khandwa) भाजप नेता आणि राज्यसभा खासदार ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia) यांच्या सभेत भाषण ऐकण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ शेतकऱ्याचा ह्रदयविकाऱ्याच्या झटक्याने मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. खंडवा जिल्ह्यात मुंदीमध्ये ही निवडणुकीसाठी लोकसभा होती. ज्येष्ठ शेतकऱ्याचा खुर्चीवर बसला असतानाच मृत्यू झाला. शिंदे सभेत येण्यापूर्वीच शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. त्यांना रुग्णालयात हलविण्यात आलं होतं. शिंदे जेव्हा व्यासपीठावर आले तेव्हा याबाबत सूचना देण्यात आली आहे. त्यानंतर सर्वांनी मौन ठेवलं व शेतकऱ्याला श्रद्धांजली वाहिली.
उतावद गावातून आलेल्या 70 वर्षीय शेतकरी जीवन सिंह हे सभेत मागच्या बाजूला खुर्चीवर बसले होते. त्यांच्या मृत्यूची बातमी पसरताच रॅलीमध्ये लोकांनी हंगामा केला. तातडीने त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
हे ही वाचा-‘भाजपचा राजीनामा दिलेला नाही’, एकनाथ खडसे यांचा मोठा खुलासा
मिळालेल्या माहितीनुसार ज्योतिरादित्य शिंदेंनी आपलं भाषण सुरू करण्यापूर्वी शेतकऱ्याला श्रद्धांजली वाहिली आणि भाषणाला सुरुवात केली. ही सभा खंडवाचे खासदार नंदकुमार सिंह चौहान देखील उपस्थित होते. ज्योतिरादित्य शिंदे भाजप उमेदवार नारायण पटेल यांच्या समर्थनार्थ आयोजित सभेला संबोधित करण्यासाठी मूंदी येथे आले होते. मध्य प्रदेशात 28 विधानसभा जागांसाठी 3 नोव्हेंबर रोजी पोटनिवडणुकी होणार आहेत.