पतीला मारली गोळी, पत्नीचं धड केलं वेगळं; तब्बल 41 मिनिटं घरात सुरू होता थरार अखेर...

पतीला मारली गोळी, पत्नीचं धड केलं वेगळं; तब्बल 41 मिनिटं घरात सुरू होता थरार अखेर...

या प्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर चार तरुणांची ओळख पटली आहे. या चौघांचा शोध सुरू असून या आरोपींनी फिल्मी स्टाइन या दाम्पत्याची हत्या केली.

  • Share this:

फरिदाबाद, 13 ऑगस्ट : फरिदाबादमध्ये एक खळबळजनक प्रकार घडला. मंगळवारी (11 ऑगस्ट) रोजी चार दुचाकी स्वारांनी दाम्पत्याच्या घरात घुसून त्यांची हत्या केली. ही घटना मंगळवारी रात्री उशीरा घडली. या प्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर चार तरुणांची ओळख पटली आहे. या चौघांचा शोध सुरू असून या आरोपींनी फिल्मी स्टाइन या दाम्पत्याची हत्या केली. या आरोपींनी आधी दाम्पत्याचे हात-पाय बांधले, त्यानंतर पतीला गोळी मारली. तर, महिलेचं डोकं भिंतीला आपटले.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सुखबीर (पती) मोनिकाला (पत्नी) डॉक्टरकडे घेऊन जात होते. तेथून दोघंही रात्री साडेअकराच्या सुमारास घरी आले. त्यानंतर मोनिका घराजवळ असलेल्या वडिलांच्या डेअरीमध्ये दूध घेण्यासाठी रोज येते, मात्र मंगळवारी न आल्यानंतर त्यांनी मोनिकाला फोन केला. मात्र तिचा फोन बंद होता.

वाचा-पुण्यात आईच्या मदतीने प्रियकराने अल्पवयीन मुलीचा केला विनयभंग

मंगळवारी रात्री 9 वाजता मोनिकाचा भाऊ मनीष तिच्या घरी पोहचला. घरात अंधार पाहून त्यानं लाइट लावली, त्यावेळी त्याने सुखबीर आणि मोनिका यांना रक्तबंबाळ अवस्थेत पडलेले पाहिले. आपल्या बहिणीची अवस्था पाहून मनीष किंचाळू लागला, त्याच्या आवाजानं शेजारी जमा झाले. ही बातमी समजताच गावातील सर्व लोक व कुटुंबीय घटनास्थळी आले घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच डीसीपी, एसीपी गुन्हे शाखा आणि इतर पोलिसांची पथके घटनास्थळी दाखल झाली. दोघांचे शव पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

वाचा-पोलीस कॉन्स्टेबलनं विवाहितेवर केला बलात्कार, अश्लील व्हिडीओ तयार करून घेतला फायदा

41 मिनिट आरोपी होते घरात

पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहेत. त्यात असे आढळले की मंगळवारी दुपारी 1.37 वाजता चार तरुण दोन दुचाकी घेऊन घराजवळील रस्त्यावर आले. घराबाहेर दुचाकी पार्क करण्यात आली. दोघांची हत्या केल्यानंतर आरोपी दुपारी 2.18 वाजता परत जात असल्याचे दिसून आले. दोन तरुण आधी घराबाहेर आले, त्यांनी दुचाकी सुरू केली आणि घराच्या जवळ उभे राहिले. थोड्याच वेळात दोन तरुण घराबाहेर पळत आले आणि दुचाकीवर बसले. त्यानंतर मारेकरी फरार झाले. पोलिसांनी सांगितले की हे सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी दिसत आहेत, सध्या त्यांची ओळख पटवली जात आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: August 13, 2020, 11:56 AM IST

ताज्या बातम्या